×

‘नथुरामची भुमिका केल्यामुळे…’, अमोल कोल्हेंकडून माऊलींच्या आळंदीत आत्मक्लेश!

लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे (Amol kolhe) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी?’ (Why I Killed Gandhi?) त्यांच्या या आगामी चित्रपटात त्यांनी गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांनी भूमिका साकारली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांच्या प्रती नाराजी निर्माण झाली आहे. त्यांनी हे पात्र साकारल्याने त्यांच्यावर विविध क्षेत्रातून टीका केली जात आहे.

अशातच अमोल कोल्हे यांनी आळंदीत जाऊन महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन करत आत्मक्लेश केला आहे. तसेच त्यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने काहींच्या भावना दुखावल्या आहेत. यानिमित्त दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. (actor Amol kolhe self tribulation in alandi for playing role of nathuram godase in why I Killed Gandhi movie)

यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, “सन २०१७ मध्ये मी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ नावाचा सिनेमा केला होता. जो आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील माझ्या भूमिकेबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यापेक्षाही मला जास्त महत्वाचं हे वाटतं की, अनेकांनी मला व्यक्तीशः ही गोष्ट सांगितली की, आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याही रुपात स्विकारलं. पण आता तुम्हाला या भूमिकेत बघणं आम्हाला पसंत पडलेलं नाही. त्यांच्या विचारांना धक्का लागल्याची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केली.”

फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “२०१७ साली अजाणतेपणानं ही गोष्ट झाली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगीरी व्यक्त करतो. कारण जी भूमिका मी केली, त्या विचारधारेचं समर्थन मी कधीही केलंल नाही आणि करणार नाही. हे मी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे. यानंतर नैतिकतेच्या दृष्टीकोनातून जी भूमिका मी भविष्यात घेईन ती आपल्यासमोर मी व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच मांडणार आहे. कुठेही ज्या युवापिढीनं माझ्यावर हा विश्वास दाखवला त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाविषयी, राष्ट्रपित्याविषयी एक संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये असं मला वाटतं,”

अमोल कोल्हे यांचा हा चित्रपट लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

 

 

Latest Post