×

राखी सावंतने मीडियासमोर केले पतीला लिपलॉक किस, व्हिडिओ घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अशी जिची ओळख आहे, ती राखी सावंत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ती कुठे कमी पडत आहे. बिग बॉस ओटीटीनंतर राखीने ‘बिग बॉस १५’ मध्ये एंट्री केली. तिच्या एन्ट्रीने शोमध्ये काहीतरी रंजक होणार याची सगळ्यांना खात्री होती. यावेळी मात्र राखीने सगळ्यांना सरप्राईज दिले. ते म्हणजे राखीने तिच्या पतीसोबत बिग बॉसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ती खूप चर्चेत आली. तिच्या पतीमधील आणि तिच्यातील प्रेम सगळ्यांनी बिग बॉसच्या घरात पाहिले आहे.

राखी (rakhi sawant) आणि तिचा पती रितेश दोघेही घराबाहेर पडले आहेत. सध्या ते सारखेच मीडियासमोर स्पॉट होताना दिसत आहेत. अशातच ते पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत. ते दोघेही ‘बिग बॉस १५’ च्या फिनालेच्या तयारीला चालले होते. अशातच त्यांना स्पॉट केले गेले आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्या दोघांनीही पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यावेळी राखीने चक्क मीडियासमोर तिच्या पतीला लीप तो लीप किस केले आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. (rakhi sawant kissing to her husbund in front of media)

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

यासोबतच तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकजण या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

राखी सावंतने ‘बिग बॉस १५’ मध्ये पहिल्यांदा तिच्या पतीचा चेहरा जगाला दाखवला. शो मध्ये असताना रितेश तिचा खरा पती नाही असे म्हटले जात होते. रितेश या शोचा कॅमेरामॅन आहे असे सगळेजण म्हणत होते. परंतु राखीने सगळ्यांच्या या प्रश्नांना पूर्णविराम दिला आणि रितेश तिचा खरा पती आहे हे सगळ्यांना सांगितले.

हेही वाचा :

Latest Post