Saturday, June 29, 2024

अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियासंदर्भात मोठा निर्णय; वाचून तुम्हीही कराल कौतुक

मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे अभिनयाबरोबरच राजकारणातही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात आपली ओळख निर्माण करणारे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे होय. ते सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.

अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “इंस्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की, पोस्टवर प्रतिक्रिया देताना ‘अभिनेता’ की ‘नेता’ अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते, पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच एक निर्णय घेतला आहे. इंस्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे कन्फुजन नको. राजकीय पोस्टसाठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना?”

त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी या पोस्टसह एक टीप देखील लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये.” त्यांच्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. त्यासह त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक देखील करत आहेत.

अमोल कोल्हे यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. तसेच ते डॉक्टर देखील आहेत. मात्र, त्यामध्ये त्यांचे जास्त मन न रमल्याने त्यांनी अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी ‘स्वराज्य रक्षक संभाजी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘राज माता जिजाऊ’, ‘वीर संभाजी’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. ते प्रेक्षकांमध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी लोकप्रिय आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला तुमच्याशी लग्न करायचे आहे’, रुपाली भोसलेचे सौंदर्य आणि सोज्वळता पाहून चाहताही झाला वेडा

-‘एकच वादा आमचा विशाल दादा’, दादूस यांनी विशालच्या सांगण्यावरून रागात गायले गाणे

-‘आमच्या अब्रूची लख्तरे चारचौकात उधळली जात आहे’, म्हणत क्रांती रेडकरने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

हे देखील वाचा