Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड ‘आता कोर्टच ठरवेल कला की अश्लीलता’, ‘बेशरम रंग’ गाण्याच्या प्रश्नावर मिलिंद सोमणला आठवले न्यूड फोटोशूट

‘आता कोर्टच ठरवेल कला की अश्लीलता’, ‘बेशरम रंग’ गाण्याच्या प्रश्नावर मिलिंद सोमणला आठवले न्यूड फोटोशूट

सध्या देशभरात शाहरुख खान याच्या ‘पठाण‘ या सिनेमातील ‘बेशरम रंग‘ या गाण्यावरून चांगलाच वाद सुरू आहे. आता या वादामध्ये अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण याने त्याच्या जुन्या फोटोशूटवरून झालेल्या वादाबद्दल वाच्यता केली आहे. तब्बल 27 वर्षांपूर्वी मिलिंद सोमण याने केलेल्या त्या फोटोशूटची चर्चा आजही होते. या फोटोशूटमुळे मिलिंद कायद्याच्या कचाट्यात सापडला होता. त्यातून बाहेर निघण्यासाठी त्याने तब्बल 14 वर्षांचा लढा दिला होता. आता ‘बेशरम रंग’ गाण्याच्या वादात अभिनेत्याने त्याच्या जुन्या वादग्रस्त फोटोशूटची आठवण काढली आहे.

‘न्यायालयच ठरवणार अश्लीलता की कला’
‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यावर सुरू असलेल्या वादात मिलिंद सोमण याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “न्यायालयच ठरवेल की, ही कला आहे की, अश्लीलता. यावर तोडगा काढावा लागेल. कोणीही कधीही पूर्णपणे समाधानी नसतो. यामध्ये माझ्या आयुष्याची 14 वर्षे लागली होती.”

मधु सप्रेसोबत केले होते न्यूड फोटोशूट
खरं तर, मिलिंद सोमण (Milind Soman) याने हे फोटोशूट त्यावेळची गर्लफ्रेंड मधु सप्रे (Madhu Sapre) हिच्यासोबत केले होते. या न्यूड फोटोशूटमध्ये (Nude Photoshoot) दोघांनीही त्यांच्या गळ्यात अजगर लटकवले होते. या फोटोशूटमध्ये दोघेही फक्त पायात बूट घालून होते. त्यांचा हा फोटो छापल्यानंतर एकच खळबळ माजली होती. त्यांनी ज्या जाहिरातीसाठी हे फोटोशूट केले होते, ती जाहिरात वाद वाढल्यानंतर बंद करण्यात आली होती.

या फोटोशूटनंतर मिलिंद सोमण याच्यावर फक्त अश्लीलता पसरवण्याचा नाही, तर वन्यजीव संरक्षण अंतर्गत न्यायालयातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कायदेशीर लढाई तब्बल 14 वर्षे चालली. शेवटी 1995च्या या वादात अभिनेत्याची 2009मध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

विशेष म्हणजे, ‘पठाण’ (Pathan) हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विशेषत: सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या छोट्या कपड्यांमुळे जास्तच टीका होत आहे. (actor and model milind soman on his nude photoshoot said court will decide whether it is art or obscenity)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंडविषयी खळबळजनक खुलासा; लाज न बाळगता म्हणालेली, ‘ब्रेकअपनंतरही…’
युट्यूबर अरमानच्या दुसऱ्या पत्नीचा खळबळजनक खुलासा! एकत्र प्रेग्नंट होण्याविषयी म्हणाली, ‘आमच्यात फक्त…’

हे देखील वाचा