Sunday, April 14, 2024

युट्यूबर अरमानच्या दुसऱ्या पत्नीचा खळबळजनक खुलासा! एकत्र प्रेग्नंट होण्याविषयी म्हणाली, ‘आमच्यात फक्त…’

नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक याच्या दोन्ही पत्नी एकसोबत प्रेग्नंट झाल्या आहेत. याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चाही झाल्या. तसेच, काहींना असाही प्रश्न पडला की, अरमानच्या दोन्ही पत्नी एकसोबत कशा प्रेग्नंट झाल्या. आता हेच गुपीत अरमानच्या पत्नीनेच सर्वांसोबत शेअर केले आहे आणि ट्रोलर्सलाही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

अरमान मलिक (Armaan Malik) याच्या पत्नीने एका माध्यमसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत यामागील गुपिताचा खुलासा केला. अरमान ट्रोलिंगविषयी म्हटला आहे की, “आम्हाला ट्रोलिंगचा काहीही फरक पडत नाही.” अरमानची दुसरी पत्नी क्रितिका मलिक (Kritika Malik) हिने मुलाखतीत याचा खुलासा केला की, दोघीही एकसोबत प्रेग्नंट कशा झाल्या.

अशाप्रकारे दोघीही एकसोबत झाल्या प्रेग्नंट
क्रितिकाने सांगितले की, “माझी आणि पायलच्या प्रेग्नंसीमध्ये जवळपास 1 महिन्याचे अंतर आहे. माझ्या प्रेग्नंसीचा निकाल आला होता. ही बातमी आम्ही सोबत शेअर केली. पायलला नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नव्हती. यामागे तिच्या शरीरातील आयव्हीएफ (IVF) ट्यूब हे कारण होतं. खरं तर, पायलला एकच आयव्हीएफ ट्यूब आहे.”

“महिलांमध्ये दोन आयव्हीएफ ट्यूब होत्या. मात्र, पायलच्या शरीरात फक्त एकच ट्यूब असल्यामुळे तिला नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होत नव्हती. यानंतर आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला. आम्ही चाचणी केली आणि ती नकारात्मक आली. मात्र, नंतर प्रयत्न केल्यावर पायलची प्रेग्नंसी चाचणी सकारात्मक आली. आम्हा दोघींमध्ये जवळपास 1 महिन्याचे अंतर आहे.”

‘ट्रोलिंगने फरक पडत नाही’
अरमानच्या पत्नीने मुलाखतीदरम्यान सांगितले की, “आम्हाला ट्रोलिंगने काहीच फरक पडत नाही. ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही, त्यांच्या वक्तव्याने आम्ही दु:खी का व्हायचं. अरमानने ही बातमी शेअर केली होती. त्यानंतर ही बातमी व्हायरल झाली आणि लोक ऑनलाईन आमच्यावर टीका करू लागले.” ट्रोलिंगबद्दल अरमान मलिक म्हणाला की, “छोट्या विचाराचे लोक नेहमी छोट्याच गोष्टी बोलतात. अशा लोकांमुळे आमच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही. जे लोक आम्हाला चांगल्याप्रकारे ओळखतात, ते आमच्या या बातमीने खुश आहेत.” ही मुलाखत एबीपी या वृत्तसंस्थेला देण्यात आली आहे.

फोटो शेअर केल्यानंतर माजली होती खळबळ
खरं तर, युट्यूबर अरमान मलिक (Youtuber Armaan Malik) सोशल मीडियामार्फत आपल्या चाहत्यांशी जोडलेला असतो. तो एक युट्यूबर असून सातत्याने व्लॉग्स बनवत असतो. अरमान सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्याने दोन्ही पत्नी क्रितिका मलिक आणि पायल मलिक ( Kritika Malik And Payal Malik) यांच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. यामध्ये त्याने सांगितले होते की, त्याच्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

अरमानच्या या फोटोनंतर इंटरनेटवर एकच खळबळ माजली होती. नेटकऱ्यांनी अरमानवर जोरदार टीका केली होती. आता अरमानने स्पष्ट केले आहे की, त्याला टीकाकारांचा काहीच फरक पडत नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातच नाही, तर ‘अवतार 2’चा डंका जगभरात; दोनच दिवसात केली ‘छप्परफाड’ कमाई
दीपिकाचा प्रसिद्ध अभिनेत्यावर होता क्रश; झोपण्यापूर्वी करायची ‘हे’ काम

हे देखील वाचा