बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांची आई दुलारी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया युजर्सला खूप आवडतात. अनुपम खेर यांनी नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ते भाड्याच्या घरात राहतात. या अभिनेत्याने सांगितले की, त्यांनी फक्त त्यांची आई दुलारी खेर यांच्यासाठी शिमल्यात घर खरेदी केले आहे. सध्या अनुपम त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे.
‘मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहतो’
यावर बोलताना अनुपम खेर म्हणाले की, “माझ्याकडे मुंबईत घरही नाही. मी भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहतो. ४-५ वर्षांपूर्वी मी ठरवले होते की, मला कोणतीही मालमत्ता घ्यायची नाही. चार वर्षांपूर्वी मी माझ्या आईसाठी शिमल्यात एक घर खरेदी केले होते.”
घरी भेट दिल्याबद्दल आईने अनुपम खर यांना फटकारले
अनुपम खेर यांना नेहमी आपल्या आईला काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यायचं होतं. कारण त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिमल्यात भाड्याच्या घरात घालवलं. त्यांच्या आईला शोघी टाउनमधील ९ बेडरूमचे घर आवडले. जे अभिनेत्याने विकत घेतले आणि त्यांच्या आईला भेट दिले. मात्र, दुलारी खेर यांना हे कळताच त्यांनी अनुपम खेर खडसावले आणि म्हणाल्या की, “तुझ डोकं खराब आहे, मला एवढे मोठे घर नको आहे.
‘द काश्मीर फाइल्स’चे यश
‘द कश्मीर फाइल्स’ने आतापर्यंत २०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९० च्या दशकात काश्मिरी पंडित, हिंदूंच्या हत्याकांडाची आणि पलायनाची कथा आहे.