Saturday, June 29, 2024

चुकलं की! भारतातील समजून अनुपम यांनी शेअर केलेला व्हिडिओ निघाला पाकिस्तानचा; नेटकरी म्हणाले…

बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. जर त्यांनी एखादा चांगला व्हिडिओ पाहिला, तर ते शेअर केल्याशिवाय राहत नाहीत. लहान मुलांची प्रचंड आवड असणाऱ्या अनुपम यांनी सोशल मीडियावर लहान मुलांचा एक व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ शेअरही केला. त्यामुळे या व्हिडिओची सध्या प्रचंड चर्चा सूरु आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुले लष्करी धुन आणि बासरी वाजवताना दिसत आहे. देशभक्तीने भरलेला हा गोड व्हिडिओ अनुपम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

अनुपम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारतातील कोणत्यातरी कानाकोपऱ्यात राहणा-या गावातील लहान मुलांनी एकत्र येऊन हा इतका सुंदर व्हिडिओ बनवला आहे. या मुलांनी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञान वापर केलेला नाही. तर त्यांनी धूनही किती सुंदर निवडली आहे, तर लष्करी ब्रँडची! त्यांनाही माहिती आहे की, खरी शक्ती फक्त ह्रदयातच असते.” तसेच त्यांनी त्या मुलांना सलाम म्हटले आहे. मात्र ही मुले नक्की आहेत तरी कुठली? असा प्रश्न आता उपस्थित केले आहे.

अनुपम यांच्या या व्हिडिओवर शहजाद राॅय या नावाच्या एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे‌. त्याने लिहिले की, “सर, हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद! मी हा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. पण तुम्ही या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जे लिहिले आहे. ते चुकीचे आहे. ती मुले भारतातील नसुन पाकिस्तानमधील हुंजा येथिल आहे. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांना हव्या त्या गोष्टी पोहचवतो.”

हे ट्वीट पाहून अनुपम यांनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी रिट्विट करत लिहीले की, “ प्रिय शहजाद राॅय, माझी चुक मी दुरूस्त केली आहे. या मुलांसाठी तुम्ही जे महान काम करत आहात ते करत रहा. तुम्हाला कायम प्रेम आणि आशिर्वाद मिळत राहील.” एक नेटकऱ्याने यावर लिहिले आहे की, “इथे प्रतिभेची कमतरता नाही, कमतरता आहे ती योग्य प्रशिक्षणाची आहे.” तसेच त्यांना लवकर सर्व मार्गदर्शन मिळेल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मुघलांना ‘डाकू’ म्हटल्यामुळे ‘या’ कलाकारांच्या निशाण्यावर आले मनोज मुंतशीर; ऋचा म्हणतेय, ‘खूपच बकवास…’

-तरुणींनाही लाजवेल असं आहे तिचं सौंदर्य! पाहा सिल्व्हर आऊटफिटमध्ये श्वेता तिवारीचा ग्लॅमरस अंदाज

-‘बिग बीं’च्या घरात निर्माण झालीय पाण्याची समस्या? ब्लॉगमध्ये कामाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा