Saturday, June 14, 2025
Home अन्य KKK: अवघ्या २० सेकंदाच्या फरकाने अर्जुन बिजलानीने ट्रॉफीवर कोरले स्वत:चे नाव, तर दिव्यांका त्रिपाठी ठरली उपविजेती

KKK: अवघ्या २० सेकंदाच्या फरकाने अर्जुन बिजलानीने ट्रॉफीवर कोरले स्वत:चे नाव, तर दिव्यांका त्रिपाठी ठरली उपविजेती

मागील काही दिवसांपासून कलर्स चॅनलवर ‘खतरों के खिलाडी’ हा शो सुरू होता. या शोचा हा ११ वा सीझन होता. हा शोमध्ये सेलिब्रिटींना अनेक प्रकारचे स्टंट करावे लागतात. यामध्ये स्पर्धकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. कधी प्राण्यांचा, तर कधी उंचीचा त्यांना सामना करावा लागतो. यावेळी देखील शोमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार सहभागी झाले होते. तर शोचा होस्ट रोहित शेट्टी नेहमीप्रमाणे या स्पर्धकांना स्टंट करायला लावताना आणि त्यांना प्रोत्साहित करताना दिसला.

यामध्ये शोच्या शेवटी ५ स्पर्धक राहिले होते. जे हे स्टंट करून अंतिम फेरीपर्यंत पोहचले होते. आता होस्ट रोहित शेट्टीने शोच्या विजेत्याचे नाव देखील घोषित केले आहे. ११ व्या सीझनचा विजेता अभिनेता अर्जुन बिजलानी हा ठरला. सोबत असणाऱ्या ४ स्पर्धकांना मागे टाकून, त्याने ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. हा शो जिंकण्याबरोबरच अर्जुनला ट्रॉफीसह एक नवीन कारही मिळाली आहे. याच्या व्यतिरिक्त त्याला बक्षीस म्हणून मोठी रक्कम देखील मिळाली आहे.

शोचा विजेता अर्जुनला सह स्पर्धक अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने शेवटपर्यंत टक्कर दिली. ती खतरों के खिलाडी ११ ची पहिली उपविजेती ठरली. दिव्यांकाने शेवटचा टास्क पूर्ण करताना अर्जुनपेक्षा जास्त वेळ लावला. दिव्यांका फक्त २० सेकंदांच्या फरकाने हा शो हारली. अर्जुन आणि दिव्यांका व्यतिरिक्त श्वेता तिवारी, राहुल वैद्य, विशाल आदित्य सिंग आणि वरुण सूद हे या शोमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहचले होते.

यापूर्वी अर्जुनने म्हटले होते की, यावेळी खतरों के खिलाडी कोरोना व्हायरसमुळे खूप वेगळा वाटत होता. तो म्हणाला की, “हे वर्ष जिंकण्याबद्दल किंवा हरण्याबद्दल नाही. आपली इच्छाशक्ती उच्च ठेवणे आणि पुढे जाणे यासाठी जास्त महत्वाचे आहे. मला खात्री आहे की, यावर्षी शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धक विजेता आहे. कारण ही परिस्थिती पूर्वी कधीही नव्हती.”

अर्जुन पुढे म्हणाला की, “यावेळी स्वतःला डार्क झोन आणि नकारात्मकतेमधून बाहेर काढण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे.” या शूट व्यतिरिक्त, अर्जुन एका अशा संस्थेला मदत करत आहे, जी देशातील हॉस्पिटलमध्ये कोव्हिड रुग्णांसाठी बेड शोधण्याचे काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा महेश भट्ट यांना समजवण्यासाठी नग्नावस्थेत रस्त्यावर धावल्या होत्या परवीन बाबी, मग पुढे…

-Netflix TUDUM: माधुरी दीक्षितचा डिजिटल डेब्यू, तर ‘अरण्यक’च्या धमाक्यासह ‘या’ प्रोजेक्ट्सची झाली घोषणा

-सिनेमागृह सुरू करण्यास शासनाचा हिरवा कंदील, तरीही ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाची तारीख लांबणीवरच

हे देखील वाचा