Wednesday, July 3, 2024

रणबीरचे नाव न घेता अर्जुन कपूर बोलला ‘असे’ काही, भडकलेल्या आलियाने थेट सोशल मीडियावर…

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर, अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आता हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’च्या शूटिंगसाठी परदेशात आहे. आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. पुन्हा एकदा तिने परदेशातून सुंदर क्षणांचे फोटो शेअर केले, ज्यावर अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) एक मजेदार कमेंट केली. आलियानेही त्याला उत्तर दिले. या दोघांच्या कमेंटमुळे सध्या ही पोस्ट खूप व्हायरल होत आहेत.

अर्जुनने करून दिली रणबीरची आठवण
आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर सूर्यप्रकाशाचा आनंद घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंसोबत आलियाने लिहिले की, “मला माझा सूर्यप्रकाश द्या आणि मी माझ्या मार्गावर निघेल.” आलियाच्या पोस्टवर अभिनेता अर्जुन कपूरने कमेंट केली, “पण, सनशाईन मुंबईत आहे आणि लव रंजनसोबत शूटिंग करत आहे.” अर्जुन कपूरच्या या कमेंटवर आलिया भट्टही गप्प बसली नाही आणि लगेच प्रत्युत्तर देत, “विनोद करणे थांबव” असे लिहिले. (actor arjun kapoor comments on alia bhatt photos)

आलिया भट्टच्या फोटोवर कमेंट करत, अर्जुन कपूरने रणबीर कपूरचे नाव न घेता तिची खेचली. आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर चांगले मित्र आहेत आणि दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत राहतात. आलियाने इंस्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती स्वत: सोबत वेळ घालवताना दिसत आहे.

आलियाचे वर्कफ्रंट
कामाबद्दल बोलायचे झाले, तर आलिया ‘हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय आलिया भट्ट करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. त्याच वेळी, ती प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत फरहान अख्तर दिग्दर्शित ‘जी ले जरा’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा