×

पहिल्या सिनेमाच्या मुहूर्त शॉट वेळी दिग्गज कलाकरांना पाहून आलियाला आले होते दडपण, द्यावे लागले अनेक रिटेक

बॉलिवूड जगतातील सर्वात जास्त चर्चित अभिनेत्रींमध्ये आलिया भट्टच्या ( Alia Bhatt)  नावाचा सर्वप्रथम समावेश होतो. आपल्या अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी कमी वयात तिने ही लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. सध्या एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या आलियाचा पहिल्या चित्रपटाचा अनुभव मात्र फारच भितीदायक होता याचा खुलासा स्वतः आलियाने  एका मुलाखतीत केला होता. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

अभिनेत्री आलिया भट्टने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या सिनेमासृष्टीतील कारकिर्दिला प्रारंभ केला होता. या चित्रपटात आलियासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही काम केले होते.आलियाने सांगितले की, “करण जोहरने सेटवर तिच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण आणले नाही. परंतु मुहूर्ताच्या शॉर्टमध्ये ती यश चोप्रा, परमेश्वर गोदरेज, शाहरुख खान आणि ऋषी कपूर या सेलिब्रिटींना सेटवर बोलावले होते, त्यांच्या समोर शूटिंग दरम्यान परफॉर्म करणे खूप कठीण होते” आणि आलिया खूप घाबरली होती. याशिवाय आलियाने सांगितले की, “या गाण्यात अनेक कॅमेरे वापरण्यात आले होते आणि त्यावेळी तिला कॅमेऱ्याच्या हालचालींची फारसा अनुभव नव्हता, त्यामुळे तिला अनेक रिटेक करावे लागले.”

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

यानंतर आलियाने ‘हायवे’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बरेच काही शिकली. अशा देसी वातावरणात ती कधीच राहिली नव्हती. जेव्हा तिला सेटवर टॉयलेटला जावं लागायचं तेव्हा क्रू मेंबर्स तिला झुडपात टॉयलेटला जावं लागेल असं म्हणायचे. या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा असल्याचे आलियाने सांगितले. भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी तिचा सहकलाकार रणदीप हुड्डाने अनेक दिवस आंघोळ केली नाही किंवा केसांवर कंगवा फिरवला नाही. असाही अनुभव तिने बोलून दाखवला दुसरीकडे, आलियाच्या पुढील चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post