Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड जेव्हा पार्टीत रणवीरसमोरच अर्जुनने केले दीपिकाला किस; पाहण्यासारखी होती अभिनेत्याची रिऍक्शन

जेव्हा पार्टीत रणवीरसमोरच अर्जुनने केले दीपिकाला किस; पाहण्यासारखी होती अभिनेत्याची रिऍक्शन

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची जोडी इंडस्ट्रीतील परिपूर्ण जोडप्यांच्या यादीत समाविष्ट आहे. चाहत्यांना या दोघांची जोडी खूप आवडते. रणवीर आणि दीपिका हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्याचबरोबर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दोघेही एकमेकांवर प्रेम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर आणि दीपिकाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांचं लग्न खूप चर्चेत राहिले होते. दरम्यान, रणवीर आणि दीपिकाचा थ्रोबॅक फोटो व्हायरल होत आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा हा व्हायरल फोटो ‘फाइंडिंग फॅनी’च्या सक्सेस पार्टीचा आहे. ‘फाइंडिंग फॅनी’ सक्सेस पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या पार्टीमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टसह दिग्दर्शक होमी अदजानिया आणि चित्रपटाचे निर्माते दिनेश विजानही ​​उपस्थित होते. त्याचबरोबर दीपिका, रणवीर आणि अर्जुन कपूर हेही समोर आलेल्या फोटोत दिसत आहेत.

त्याचवेळी, चाहते हा फोटो पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. फोटोमध्ये आपण पाहू शकता की, अर्जुन आणि दीपिका पदुकोण यांनी पार्टीमध्ये एकमेकांना मिठी मारली आणि अर्जुनने सर्वांसमोर दीपिकाच्या गालावर किस केले. यावेळी रणवीरही समोर होता. त्यादरम्यान रणवीर सिंगचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे होते.

‘फाइंडिंग फॅनी’ चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होते. याशिवाय पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह आणि डिंपल कपाडिया हेही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते. दुसरीकडे, जर आपण रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो, तर तो अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

तो वर्ल्डकपवर आधारित ‘८३’ चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तो ‘सूर्यवंशी’ चित्रपटातही एक छोटासा रोल करताना दिसणार आहे. रणवीर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तारक मेहता…’मध्ये पुन्हा पाहायला मिळणार ‘रिटा रिपोर्टर’चा जलवा; बोल्ड फोटोंनी करते सोशल मीडियावर राडा

-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

हे देखील वाचा