टीव्हीवर अशा अनेक मालिका आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या ह्रदयात अगदी जवळची जागा निर्माण केली आहे. यातीलच एक म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ होय. मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाली आहे. त्या मालिकेतून प्रत्येक मुद्दा प्रेक्षकांना त्यांच्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न या मालिकेतील कलाकार करत असतात. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाले आहे. प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच या मालिकेमध्ये एक महत्वाचे पात्र परतणार आहे.
रिटा रिपोर्टर परतली शोमध्ये
रिटा रिपोर्टरचे पात्र साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा या मालिकेत परतली आहे. प्रिया बर्याच दिवसांपासून मालिकेत दिसली नव्हती. अशा परिस्थितीत चाहत्यांना वाटले की, प्रियानेही शो सोडला आहे. मात्र, प्रियाने हा शो सोडला नव्हता, तर ती शोमध्ये न दिसण्याचे कारण काही वेगळेच आहे. प्रियाने शोचे दिग्दर्शक मालव राजदा यांच्याशी लग्न केले आहे, त्यामुळे ती शोचा एक भाग बनली आहे.
प्रिया मालिकेमध्ये कमी दिसू शकते, पण सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात. नुकतेच तिने बिकिनीमधील काही फोटो शेअर केले आहेत. ज्यांना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. बऱ्याच वेळा प्रिया तिच्या फोटोमुळे ट्रोलिंगची शिकार बनते, पण या सगळ्याची पर्वा न करता ती तिचे बोल्ड फोटो शेअर करते.
काही दिवसांपूर्वी प्रियाने तिच्या पतीसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यावर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रिया देखील आई आली आहे. प्रिया सोशल मीडियावर आपल्या मुलाला कसे सांभाळावे यासाठी नेहमी धडे देत असते.
आता शोमध्ये रिटा रिपोर्टर परत आल्यापासून, चाहते देखील दया भाभी म्हणजेच दिशा वकानीच्या परतण्याची वाट पाहत आहेत. दिशा सध्या शोमध्ये परत कधी येईल? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्पष्ट वय दिसतेय!’ म्हणून ट्रोल करणाऱ्याला सोनालीचा जोरदार पंच, म्हणाली…
-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’










