Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड आपल्यापेक्षा जवळपास ११ वर्षांनी मोठ्या असलेल्या मलायकावरील अर्जुनचे प्रेम पुन्हा आले दिसून; म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड….’

आपल्यापेक्षा जवळपास ११ वर्षांनी मोठ्या असलेल्या मलायकावरील अर्जुनचे प्रेम पुन्हा आले दिसून; म्हणाला, ‘माझी गर्लफ्रेंड….’

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक जोड्या तयार झाल्या अन् तुटल्याही. मात्र, यातील काही जोड्या अशाही आहेत, ज्यांनी वयाच्या बंधनाला छेद देत एकमेकांवर प्रेम केले. अशीच एक जोडी म्हणजे बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांची. त्यांची लव्हस्टोरी ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात हटके लव्हस्टोरींपैकी एक आहे. त्यांच्या वयात जवळपास ११ वर्षांचे अंतर आहे. परंतु तरीही दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. अर्जुन आणि मलायका आता माध्यमांसमोर खुलेपणाने एकमेकांवर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता पुन्हा एकदा अर्जुनचे मलायकावरील प्रेम दिसून आले.

मलायकावर आहे अर्जुनचं प्रेम
नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अर्जुनने पुन्हा एकदा मलायकाप्रती आपले प्रेम व्यक्त केले. पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, रेडिओ होस्ट सिद्धार्थ कननसोबत झालेल्या चर्चेत अर्जुनला विचारले गेले की, त्या व्यक्तीचे नाव सांग, जी तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. या प्रश्नाचे उत्तर देताना अर्जुनने स्पष्टपणे मलायकाचे नाव घेतले.

या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “तसं तर माझी गर्लफ्रेंड मला आत- बाहेर सगळीकडून ओळखते.” अर्जुन म्हणाला की, “जर तिचा मूड खराब आहे किंवा दिवस खराब राहिला, तर ती देखील गोष्टी पटकन ओळखते.” मलायकाशी नात्यात आल्यावर अर्जुन खूप काळापर्यंत आपले नाते लपवण्याचा प्रयत्न करत होता.

व्हायरल झाले फोटो
तरीही, नंतर दोघांनीही हिम्मत दाखवत केवळ आपल्या नात्याचा मोकळेपणाने स्वीकारच केला नाही, तर सोशल मीडियापासून ते मुलाखतीपर्यंत एकमेकांबद्दल मोकळेपणाने चर्चाही केली. सोशल मीडियावर त्यांचे सोबतचे आणि किस करतानाचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा