Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड ‘आता ती वेळ आली आहे…’ म्हणत विद्युत जामवालने लैंगिक समस्यांसाठी सांगितले तब्बल 19 व्यायाम प्रकार

‘आता ती वेळ आली आहे…’ म्हणत विद्युत जामवालने लैंगिक समस्यांसाठी सांगितले तब्बल 19 व्यायाम प्रकार

विद्युत जामवाल हिंदी सिनेसृष्टीमधला एक दमदार आणि अतिशय फिट अभिनेता. विद्युतने स्वबळावर बॉलिवूडमध्ये त्याचे नाव आणि स्थान मिळवले आहे. विद्युत अभिनयासोबतच त्याच्या मार्शल आर्टसाठी देखील ओळखला जातो. त्याने वयाच्या तीन वर्षांपासून मार्शल आर्ट आणि कलरीपायट्टुचे प्रशिक्षण घेतले आहे. विद्युत एक मार्शल आर्ट प्रशिक्षक सुद्धा आहे. त्याच्या ऍक्शन आणि स्टंटसाठी तो नेहमीच कौतुकास पात्र ठरत असतो.

नुकतीच विद्युतने एक पोस्ट सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. ही लोकांच्या आरोग्याशी संबंधित असून लैंगिक आरोग्यावर या पोस्टमधून त्याने भाष्य केले आहे. हा विषय आपण अगदी मुक्तपणे आणि सहजतेने सार्वजनिक रित्या बोलण्यास शिकले पाहिजे. आरोग्यदायी राहण्यासाठी लैंगिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे विषय सार्वजनिक पद्धतीने बोलण्यास हरकत नसावी, असे तो आपल्या पोस्टमधून सांगत आहे.

विद्युतने त्याच्या इंस्टागरं अकाऊंटवरून लैंगिक आरोग्यासंबंधात एक पोस्ट केली असून सोबतच एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने 19 असे व्यायाम प्रकार सांगितले आहे, ज्यामुळे लैगिक आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय इरेक्टाइल डिसफंक्शनपासून देखील वाचता येऊ शकेल. विद्युतने इंस्टाग्रामसोबतच त्याच्या यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना विद्युतने लिहिले की, “आता ती वेळ आली आहे जेव्हा आपण लैंगिक आरोग्य आणि इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुंसकता यांबद्दल उघडपणे बोलावे. 10 पैकी एक व्यक्ती आज इरेक्टाइल डिसफंक्शन या आजाराने ग्रस्त आहे. मी या व्हिडिओमध्ये कलारीसूत्रांचे 19असे व्यायामप्रकार दाखवत आहे जे रोज न चुकता केल्याने तुमचा रक्तप्रवाह सुरळीत होऊन व्यवस्थित काम करेल आणि सोबतच लैंगिक एनर्जीसुद्धा टिकवेल.”

विद्युतने नुकतेच तो जगातल्या टॉप मार्शल आर्ट कलाकारांमध्ये सामील झाल्याचे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत सांगितले आहे. जेट ली, जैकी चैन, ब्रूस ली, जॉनी ट्राई गुयेन, स्टीवन सीगल, डोनी येन, टोनी जा आदी मोठ्या आणि महान कलाकारणसोबत विद्युतचे नाव आल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

हेही वाचा-
रितेश देशमुख करणार राजकारणात एंट्री? देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…
पतीवर लावला चाकूहल्ल्याचा आरोप, तर ‘या’ कारणामुळे रति अग्निहोत्री गेल्या होत्या चित्रपटांपासून लांब

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा