Saturday, March 14, 2026
Home कॅलेंडर चित्रपटसृष्टीतल्या लग्नसराईत ‘या’ अभिनेत्याने देखील लावला नंबर, अनेक कलाकारांनी लावली लग्नाला हजेरी

चित्रपटसृष्टीतल्या लग्नसराईत ‘या’ अभिनेत्याने देखील लावला नंबर, अनेक कलाकारांनी लावली लग्नाला हजेरी

नवीन वर्ष सुरु झाले आणि मराठी चित्रपटसृष्टीं लग्नसराई सुरु झाली. २०२१ या नवीन वर्षाचा मुहूर्त साधत अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हीने मेहुल पै सोबत लग्न केले. आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेता आशुतोष कुलकर्णी याने देखील लगीनगाठ बांधली आहे.

Image: instagram/shree.ashutosh

अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि अभिनेत्री रुचिका पाटील यांचा विवाहसोहळा ८ जानेवारी २०२१ रोजी पुण्यामध्ये सध्या पद्धतीने मात्र थाटात पार पडला आहे. अभिनेत्री धनश्री काडगावकर आणि तीचा पती दुर्वेश देशमुख तसेच अभिनेत्री सायली देवधर यांच्यासोबत अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.

‘असंभव’, ‘साथ दे तू मला’, ‘चेकमेट’ अशा गाजलेल्या मालिकांमधून लोकप्रिय झालेला आणि घराघरात पोहचलेल्या आशुतोष कुलकर्णीने अभिनेत्री रुचिका पाटील हिच्यासोबत लग्न केले आहे. रुचिका पाटील देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. तिने ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘असे हे कन्यादान’ या मालिकांमध्ये काम केले आहे. रुचिका पाटीलने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून, ती २०१४ साली झालेल्या महाराष्ट्र टाइम्सच्या श्रावणक्वीन स्पर्धेची सेकेंड रनरप ठरली होती. अभिनयाव्यतिरिक्त रुचिकाला क्राफ्टिंग आणि पेंटिंगची विशेष आवड आहे. या लग्नसोहळ्याचे अनेक फोटोज सध्या सोशल मीडियावर खूप वायरल होत असून या नवदाम्पत्याला मराठी सिनेसृष्टीतुन आणि त्यांच्या फॅन्सकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहे. पाहूया त्यांच्या लग्नाचे काही फोटोज.

हे देखील वाचा