बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला चेहरा आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये जास्त करून नकारात्मक भूमिका निभावल्या आहेत. आशुतोष एक अभिनेत्यासोबत एक निर्माता आणि लेखक देखील आहेत. त्यांनी मराठी, तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. ‘संघर्ष’ आणि ‘दुश्मन’ या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे. (10 नोव्हेंबर) आशुतोष त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास गोष्टी.
आशुतोष यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 साली झाला. आशुतोष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली होती. त्यांनी ‘स्वाभिमान’, ‘फर्ज’, ‘साजिश’, ‘वर्ष और बाजी किसकी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘काली एक अग्नी परीक्षा’ मध्ये नकारात्मक भूमिका निभावली होती. (Actor Ashutosh Rana birthday special : let’s know about his life)
त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले. परंतु ‘दुश्मन’ या एका चित्रपटाने त्यांना खरी ओळख दिली. या चित्रपटात त्यांनी एका सायको किलरची भूमिका निभावली होती. तसेच त्यांनी ‘संघर्ष’ या चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका निभावली होती. त्यांचा अभिनय पाहून सगळेच हैराण झाले होते. त्यांनी ‘बादल’, ‘अब के बरस’, ‘आवारापन’ यांसारख्या चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
आशुतोष राणांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत लग्न केले आहे. लग्नाच्या १९ वर्षानंतर देखील सोशल मीडियावर ते त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. रेणुकाला पाहिल्या क्षणीच आशुतोष यांना ती खूप आवडली होती.
आशुतोष आणि रेणुकाची पहिली भेट लिफ्टमध्ये झाली होती. त्यानंतर त्या दोघांमध्ये गप्पा झाल्या. यानंतर आशुतोष यांनी दसऱ्याला रेणुकाला शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला होता. परंतु त्यावेळी त्यांना माहित नव्हते की, रात्री १० नंतर रेणुका अनोळखी क्रमांकाला उत्तर देत नाही. नंतर रेणुकाने त्यांना धन्यवाद म्हटले आणि त्यांना तिचा वैयक्तिक नंबर दिला. जवळपास ३ महिने ते कॉलवर एकमेकांशी बोलत होते. काही दिवसांनंतर आशुतोष यांनी एक कविता ऐकवून प्रपोज केले. तिने देखील लगेच त्यांना होकार दिला होता. नंतर त्यांनी घरच्यांच्या परवानगीने लग्न केले. या जोडप्याला दोन मुलं आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कार्तिक आर्यन ’या’ दिग्गज अभिनेत्याच्या बहिणीला करतोय डेट? पसरलेल्या बातम्यांवर अभिनेत्याने सोडलं मौन
राजपालच्या ‘अर्ध’पूर्वी ‘या’ चित्रपटांमध्ये दाखवलीय किन्नरची कहाणी, आशुतोष राणांच्या भूमिकेने तर थरथर कापेल अंग