Thursday, February 22, 2024

कार्तिक आर्यन ’या’ दिग्गज अभिनेत्याच्या बहिणीला करतोय डेट? पसरलेल्या बातम्यांवर अभिनेत्याने सोडलं मौन

बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताचं अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) याने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कार्तिक आर्यन त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. कार्तिकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आलं. आता कार्तिकचं नाव अभिनेता हृतिक रोशनची बहीण पशमीना रोशन(Pashmina Roshan) हिच्याशी जोडलं जात आहे. या चर्चांवर खुद्द कार्तिकनेच प्रतिक्रिया दिल्याचं कळतंय. कार्तिक आर्यनच्या एका चाहत्याने ट्विटरवर असा दावा केला आहे. कार्तिकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर उत्तर दिल्याचं या चाहत्याने म्हटलंय. याचा स्क्रीनशॉटसुद्धा संबंधित चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

एका फॅनपेजवरून कार्तिकला पश्मिनासोबतच्या त्याच्या अफेअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कार्तिकने लिहिलं, ‘नाही’. म्हणजेच त्याने स्पष्ट शब्दांत अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. कार्तिक आणि अभिनेत्री सारा अली खान यांचं अफेअरसुद्धा इंडस्ट्रीत खूप चर्चेत होतं. या दोघांनी ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यापूर्वी ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चित्रपटाच्या सेटवर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pashmina Roshan (@pashminaroshan)

पशमीनाने हृतिक रोशनसोबत चांगले संबंध आहेत. लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती ‘इश्क विश्क’ च्या सिक्वेल ‘इश्क विश्क रिबाउंड’मध्ये दिसणार आहे. सोशल मीडियावर त्याला 58 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. कार्तिक आर्यन देखील त्याच्या फॉलोअर्सपैकी एक आहे. पशमीना तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.

कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या कार्तिक ‘फ्रेडी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये कार्तिकची न दिसणारी स्टाईल पाहायला मिळाली. हा चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर थिएटरऐवजी प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष यांनी केले आहे. ‘फ्रेडी’नंतर कार्तिक आर्यनच्या खात्यात अनेक चित्रपट आहेत. ‘शेहजादा’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘कॅप्टन इंडिया’ आणि कबीर खानच्या पुढील चित्रपटातही तो दिसणार आहे.(kartik aaryan reacts on dating hrithik roshan sister pashmina roshan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांवर नाराज;पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘पंचिंग बॅग…’

The Kashmir Files | पाकिस्तान आणि चीनमुळे विवेक अग्निहोत्रींनी बंद केलं ट्विटर अकाउंट? वाचा संपूर्ण प्रकरण

हे देखील वाचा