बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना अभिनयासोबतच त्याच्या गायकीसाठीही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. साहजिकच, आयुष्मान नेहमीच नवीन भूमिका साकारून चाहत्यांची पहिली पसंती राहतो. आता बॉलिवूडचा अनुभवी कलाकार आयुष्मान पुन्हा एकदा आपल्या नवीन प्रोजेक्टसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘ऍक्शन हिरो’ या आपल्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे.
आयुष्मान पुन्हा एकदा आनंद एल रायसोबत धमाका करण्याची तयारी करत आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, हा चित्रपट खूप खास असणार आहे. अनिरुद्ध अय्यर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, त्यांनी नीरज यादव यांच्यासह हा चित्रपटाचे लेखन केले आहे.
Dikkat Bas Ek Hi Hai, Mujhe Ladne Ki Acting Aati Hai, Ladna Nahin… Super excited for a genre-breaking collab ONCE AGAIN with @aanandlrai and #BhushanKumar! This one’s special! #ActionHero
Directed By – #AnirudhIyer
Written By – @Neerajyadav911 & #AnirudhIyer pic.twitter.com/G5zYRr7jOt— Ayushmann Khurrana (@ayushmannk) October 9, 2021
आयुष्मान खुराना दिसणार ऍक्शन हिरोच्या अवतारात
व्हिडिओमध्ये आयुष्मानचा बॅकग्राऊंड आवाज ऐकू येतो. तो म्हणतो की, “हिरो होतो म्हणून दोन आयुष्य जगत होतो, एक पडद्यावर आणि एक खऱ्या आयुष्यात. त्याने येऊन दोघांमधील धागा ओढला. रोमँटिक हिरो असता, गाणं गाऊन डान्स केला असता, परंतु लढावे लागेल यार. समस्या फक्त एकच आहे, मला लढाईचा अभिनय येतो, लढाई नाही.”
आयुष्मानच्या चित्रपटाच्या शीर्षकावरून हे समजत आहे की, चित्रपटात जबरदस्त ऍक्शन असणार आहे. हा त्याचा पहिला ऍक्शन चित्रपट असेल. आयुष्मानने अनेक अनोख्या विषयांवर काम केले आहे, पण त्याने अद्याप एकाही ऍक्शन चित्रपटात काम केलेले नाही. भूषण कुमारच्या टी-सीरिजच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट पडद्यामागील आणि पुढच्या दोन्ही गोष्टी दाखवणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला की, “स्क्रिप्ट ऐकताच मी लगेच या चित्रपटाला हो म्हणालो. हा चित्रपट पूर्णपणे फ्रेश आहे. त्याची कथा वेगळी आहे आणि त्यात सर्व काही आहे, ज्यासाठी मी येथे आलो आहे.” आयुष्मान तिसऱ्यांदा आनंद एल राय यांच्यासोबत काम करणार आहे आणि त्याबद्दल तो खूप उत्साही आहे.
आयुष्मान म्हणाला की, “माझी एकच प्रार्थना आहे की, ज्या पद्धतीने आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आलो आहोत, त्याचप्रमाणे हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.” भूषणजींसोबत टी-सीरिजमध्ये काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि कलर येलो हे माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखे आहे.”
त्याचवेळी आनंद एल राय म्हणाले की, “आम्ही पहिल्यांदाच एका ऍक्शन चित्रपटात एकत्र आहोत, पण त्याआधी आयुष्मानसोबत दोन चित्रपट बनले आहेत. त्याच्यासोबत काम करणे नेहमीच आश्चर्यकारक असते. हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित होण्याबद्दल मी खूप उत्साहित आहे.”
आयुष्मानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं, तर तो ‘डॉक्टर जी’ आणि ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-KBC: ‘बिग बींमुळेच झालंय जिनिलियासोबत लग्न…’, रितेश देशमुखने केला मोठा खुलासा










