Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

काय बॉडी आहे राव! बॉबी देओलने ट्रेनरसोबतचा फोटो केला शेअर; पाहायला मिळाले, ‘डोले- शोले’

अभिनेता बॉबी देओलने आपल्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो आपल्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही भलताच सक्रिय असतो. यावर तो आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. बॉबी आणखी एका गोष्टीसाठी ओळखला जातो, ते म्हणजे त्याची बॉडी. तो त्याच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठीही चर्चेत असतो. बॉबीच्या बॉडीचे त्याचे चाहतेच नाही, तर त्याचे वडील आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्रही चाहते आहेत. याचा प्रत्यय नुकताच बॉबीने शेअर केलेल्या पोस्टवरून आला आहे.

बॉबीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच धर्मेंद्र यांनीही कमेंट केली आहे. (Actor Bobby Deol Shwon His Biceps Dharmendra Says My Baby Face Body Builder)

बॉबीने शेअर केलेल्या या फोटोत त्याचा ट्रेनरही दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “चार वर्षे लोटली आहेत आणि आताही तेवढ्याच मेहनत आणि दृढ संकल्पाची गरज आहे. प्रज्ज्वल शेट्टीसोबत पहिल्यापेक्षा अधिक मजबूत.”

बॉबीने या पोस्टवर वर्कआऊट संबंधित अनेक हॅशटॅग्जही दिले आहेत. बॉबीच्या या फोटोवर त्याचे वडील धर्मेंद्र यांनी केलेल्या कमेंटने लक्ष वेधले आहे. त्यांनी कमेंट करत लिहिले आहे की, “खूप प्रेम माझा बेबी फेस बॉडी बिल्डर. आपल्या सल्लागाराला माझे प्रेम दे.” यानंतर दुसऱ्या कमेंटमध्ये त्यांनी लिहिले की, “ग्रेट, तुम्हा दोघांवर देवाची कृपा राहो.”

बॉबी देओल, सनी देओल हे दोघेही धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचे सुपूत्र आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बॉबीने आपला मोठा भाऊ सनीच्या वाढदिवशी एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तो आपली बहीण विजाता आणि आजितासोबत दिसत होता.

बॉबीने बॉलिवूडमध्ये आपली दुसरी ओळख ही सलमान खानच्या ‘रेस ३’ या चित्रपटातून केली आहे. यानंतर तो सतत चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये झळकताना दिसत आहे. ‘रेस ३’मध्ये बॉबीने पहिल्यांदा शर्टही काढला होता. तो नुकताच नेटफ्लिक्सवरील सीरिज ‘क्लास ऑफ ८३’ आणि ‘आश्रम’ यामध्येही झळकला आहे. आता तो ‘लव्ह हॉस्टेल’, ‘अपने २’ आणि ‘ऍनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे.

हे देखील वाचा