Monday, June 17, 2024

सगळं चांगलं सुरू असतानाच ‘त्या’ कारणामुळे अर्चनाने मारली कृष्णाला लाथ; व्हिडिओ जोरदार व्हायरल

अभिनेत्री अर्चना पुरन सिंगने ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच तिने अनेक विनोदी पात्र देखील निभावली आहेत. या दिवसात ती चित्रपटात जास्त दिसत नाही, परंतु ‘द कपिल शर्मा शो’मधून ती दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसेच सोशल मीडियावर देखील ती तिच्या चाहत्यांशी जोडून असते. अशातच तिने ‘द कपिल शर्मा’ शोमधील एक बीटीएस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये कृष्णा अभिषेक हा धर्मेंद्र यांच्या कॉस्च्युममध्ये दिसत आहेत.

शोमध्ये कृष्णा नेहमीच धर्मेंद्रचा अभिनय करत असतो. या व्हिडिओमध्ये तो धर्मेंद्र यांचा अभिनय करत अर्चनाला म्हणतो की, “आज तर तुम्ही अगदी ड्रीम गर्ल दिसत आहात. आज तुम्ही जो ड्रेस घातला आहे, तो सगळ्यात सुंदर ड्रेस आहे. कमीत कमी सतराशे रुपयांचा असेल ना.” त्याच्या या बोलण्यावर नंतर सगळेच खूप हसतात. यावर अर्चना त्याला मारण्याचा अभिनय करते. (The kapil sharma show, krishna Abhishek makes fun of archana puran singh weight and her dress renj)

या व्हिडिओमध्ये अर्चना पुरन भाजीच्या गाडीवर बसलेली असते, तर कृष्णा अभिषेक धर्मेंद्र यांच्या अवतारात त्या गाडीला धक्का करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, गाडी काही पुढे सरकत नाही. यानंतर तो म्हणतो की, “मी हाच विचार करत होतो की, गाडी पुढे का सरकत नाही, मग पाहिलं की, तुम्ही बसलेल्या आहात.” यावर ती केवळ हसते.

https://www.instagram.com/reel/CVnrCexIJf7/?utm_source=ig_web_copy_link

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अर्चनाने हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिच्या ड्रेसवर उगाच मस्ती म्हणून कृष्णाने पालकची गड्डी ठेवली. यापुढे तो तिला म्हणतो की, “अर्चनाजी हा पडदा मला देशील मला क्रोमा शूट करायचा आहे.” यानंतर अर्चना त्याला लाथ मारते. यावर कृष्णा म्हणतो की, “हे आमचे जुने प्रेम आहे.”

या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा तिला म्हणतो की, ती इंस्टाग्रामवर फॉलोवर्स वाढवण्यासाठी असे काहीतरी करते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘द कपिल शर्मा’ हा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो आहे. अनेकजण या शोचे आणि शोमधील कलाकारांचे चाहते आहेत. मागील काही काळासाठी हा शो बंद होता. त्यावेळी सगळेच हा शो परत कधी चालू होईल याची वाट बघत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘केबीसी १३’मध्ये स्पर्धकाने केले ‘असे’ काही; अमिताभ बच्चन म्हणाले, ‘स्वप्नातही विचार केला नव्हता…’

-‘क्वीन’ म्हणत सलमान खानने उडवली खिल्ली; संतापलेल्या शमिताचे प्रत्युत्तर, भाईजाननेही घेतली शाळा

-शाहिदने लपून काढला मीराचा कपडे घालतानाचा व्हिडिओ, बघण्यासारखी होती पत्नीची रिऍक्शन

हे देखील वाचा