मनोरंजन विश्वाला एक मोठा धक्का बसला आहे. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी (Brijesh Tripathi Passed Away) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रिजेश त्रिपाठी हे एक उत्तम अभिनेता होते. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. त्यांच्या निधनाने भोजपुरी आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिजेश त्रिपाठी (Brijesh Tripathi ) यांना 2 आठवड्यांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर मेरठमधील रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. मात्र, मुंबईत परतल्यानंतर रविवारी (18 डिसेंबर) रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
ब्रिजेश त्रिपाठी यांनी 1979 मध्ये ‘सैया तोहरे कारण’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, रवी किशन, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. ब्रिजेश त्रिपाठी यांनी बॉलिवूडमध्ये 250 हून अधिक चित्रपटात केले आहेत.
1980 च्या दशकात त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी भोजपुरी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारल्या. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी भोजपुरी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ब्रिजेश त्रिपाठी यांच्या निधनाच्या बातमीनंतर भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
ब्रिजेश त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ब्रिजेश त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, रवी किशन, धर्मेंद्र आणि विनोद खन्ना यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Actor Brijesh Tripathi who worked with Amitabh Bachchan passed away due to a heart attack)
आधिक वाचा-
–शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटाने जिंकली मनं! सेन्सॉर बोर्डाच्या स्क्रीनिंगमध्ये मिळाले स्टँडिंग ओव्हेशन
–‘VD 18’ च्या शूटिंगदरम्यान वरुण धवन गंभीर जखमी, सोशल मीडियावर फोटो शेअर करून अभिनेत्याने दिली माहिती