‘ब्रूस ली’ एक असे अभिनेता, दिग्दर्शक आणि मार्शल आर्टिस्ट होते, ज्यांची बुक्की लागण्या आधीच माणूस खाली पडत होता. अमेरिकेत जन्मलेल्या ब्रूस ली, लोकांमध्ये त्याचे ऍक्शन सिनेमे आणि मार्शल आर्ट पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे. परंतु इतकी प्रसिद्धी मिळवलेल्या ब्रूस लीच्या कथेचा अंत, अतिशय दुर्दैवी होता. ब्रूस ली याने एवढं नाव कमावल्यानंतर, अगदी कमी वयात २० जुलै, १९७३मध्ये अखेरचा श्वास घेतला. अभिनेता आणि मार्शल आर्टिस्ट ब्रूस लीने हॉलिवूडमध्ये फक्त सात सिनेमांमध्ये काम केलं होतं, ज्यातील तीन त्याच्या निधनानंतर प्रदर्शित झाले. मात्र, लोकांना त्याचे काम इतके आवडते की, त्याच्या मरणाच्या इतक्या दिवसांनंतरही हा चेहरा नेहमीच चर्चेत असतो. सिनेमाविश्व फक्त ब्रूस लीला ओळखतच नाही, तर अजूनही त्याला अनुभवते. बुधवारी (दि. २० जुलै) ब्रूस लीची ४९वी पुण्यतिथी आहे. चला तर मग त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या जीवन प्रवासाबद्दल.
छोट्या वयात केले पदार्पण
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे २७ नोव्हेंबर, १९४० रोजी जन्मलेल्या ब्रूस ली (Bruce Lee) याने लहानशा वयातच अभिनय जगतात पाऊल टाकलं होतं. १८ वर्षांच्या वयातच २० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या ब्रूस ली याचे मार्शल आर्ट पाहून लोकांना दातखिळी बसायची. तो अगदी कमी वयातच मार्शल आर्टमध्ये इतका कुशल झाला होता की, प्रेक्षकांसोबतच मोठे-मोठे फायटर्सही, त्यांची कला पाहून दंग होत. त्याला त्याच्या कलेवर इतकं प्रेम होतं की, तो एकही दिवस त्याचा सराव बुडवत नव्हता.
View this post on Instagram
मार्शल आर्ट्सच्या जगातील काळा दिवस
सिनेमांमध्ये अभिनय करणे आणि त्याचे दिग्दर्शन करणे यासोबतच, ब्रूस ली एक मार्शल आर्ट ट्रेनरही होता. तो लहान मुलांना त्याच्यासारखंच गौरवशाली बनवण्याचा प्रयत्न करत होता, पण २० जुलै, १९७३ला हाँगकाँगमध्ये असं काही झालं, की तो फक्त आपल्या आठवणीमध्येच राहिला. असे म्हटले जाते की, २० जुलै, म्हणजेच आजपासून ४९ वर्षांआधी ब्रूस ली आपला आगामी सिनेमा ‘गेम ऑफ डेथ’ची तयारी करण्यासाठी निर्माते ‘रेमंड चो’ (Raymond Cho) यांना भेटायला त्याच्या घरी गेले. तिथे अचानकच त्याचे डोके खूप दुखायला लागले आणि त्याच्या मित्राने त्याला एक एनालजेसिक (Analgesic) औषध दिले. या औषधाने रिऍक्शन केली, ज्यामुळे ब्रूस लीच्या मेंदूचा आकार १३ टक्के वाढला आणि त्याचा मृत्यू झाला. या दिवसाला मार्शल आर्ट्सच्या जगातील काळा दिवस म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण, खूप फायटर आले आणि गेले, पण ब्रूस लीसारखं कोणी बनू शकलं नाही.
View this post on Instagram
शापाने झाला ब्रूस लीचा मृत्यू?
सिनेमांचे सेट्स आणि फाइट्समध्ये समोरच्याचा घाम काढणारा ब्रूस लीचा मृत्यू अचानक झाला होता. त्याच्या मृत्यूशी निगडीत अनेक अफवा पसरल्या आहेत. ब्रूस लीच्या मृत्यूला लोकांनी शापासोबतही जोडले आहे. यासह काही लोकांचे असेही म्हणणे आहे की, एक गुप्त चीनी संस्था ‘ट्रिआड’ने ब्रूस ली याची हत्या करण्यास सांगितले होते. परंतु अफवा बाजूला ठेवल्या, तर ब्रूस लीच्या मृत्यूचे कारण अतिशय दुर्दैवी आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, मल्याळी अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम
चाहत्यांसाठी खुशखबर! राणादा आणि पाठक बाईंची जोडी झळकणार ‘या’ बिगबजेट चित्रपटात
‘जो दिखता है, वो बिकता है’ उर्फी जावेदने ट्रान्सपरेंट कटआऊट ड्रेस परिधान करताच भडकले चाहते