चाहत्यांसाठी खुशखबर! राणादा आणि पाठक बाईंची जोडी झळकणार ‘या’ बिगबजेट चित्रपटात

0
62
Hardik Joshi & Akshaya Deodhar
Photo Courtesy: Instagram/akshayaddr

मराठी टेलिव्हिजनवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. मालिका तर गाजलीच त्याचबरोबर मालिकेचे कलाकार राणादा आणि पाठक बाईंची जोडीही प्रचंड गाजली. मालिकेतील त्यांच्या केमिस्ट्रीचे जोरदार कौतुक झाले होते. त्यानंतर अलिकडेच दोघांनीही साखरपुडा करत त्यांच्या चाहत्यांना जोराचा धक्का दिला होता. सोशल मीडियावर तुफान चर्चेत असलेली ही जोडी आता लवकरच चित्रपटांतही एकत्र दिसणार आहे.  त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आता या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.

अभिनेत्री अक्षया देवधर (Akshay Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardik Joshi) ही मराठी सिने जगतातील सध्या चर्चित जोडी म्हणून ओळखली जात आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. अलिकडेच त्यांनी साखरपुडा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मालिकेत एकत्र काम केल्यानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हार्दिक आणि अक्षया लवकरच फाईल नंबर-४९८ अ या मराठी चित्रपटात एकत्रितपणे झळकणार आहेत. चित्रपटात दोघांचीही प्रमुख भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचे पोस्टर लॉंन्च केले गेले होते. या चित्रपटाची निर्मिती आरती श्रीधर तावरे यांनी केली आहे. त्याचबरोबर मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत मल्हार गणेश दिग्दर्शित फाईल नंबर ४९८ अ या चित्रपटाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिली आहे.

तर श्रीधर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. स्वप्नील- प्रफुल्ल यांच संगीत दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलेल आहे. कायद्यातील ४९८ अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here