Sunday, May 19, 2024

अक्षय, सलमान यांच्यामुळे चंकी पांडे यांना मिळाले नाही काम?, स्वतःच केला खुलासा

अभिनेता चंकी पांडे हे बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. ९० च्या दशकात सलमान खान आणि गोविंदा सारख्या अभिनेत्यांसोबतच चंकी पांडे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र चंकी पांडे यांना बॉलीवूडमध्ये ते यश मिळाले नाही, ज्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते. चंकी पांडे यांनी १९८६ मध्ये ‘आग ही आग’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. परंतु अभिनेता चंकी पांडे यांना काही काळानंतर बॉलिवूडमध्ये चांगले काम मिळणे बंद झाले. यामुळे त्यांनी संपूर्णपणे बांग्लादेशी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

बांग्लादेशी चित्रपटांमध्ये चंकी पांडे यांना वेगळी ओळख मिळाली. तिथे आपला ठसा उमटवल्यानंतर चंकी पांडे यांनी भावना पांडे यांच्याशी लग्न केले. त्यानंतर भावना पांडे यांनी चंकी यांना परत येऊन भारतीय चित्रपटसृष्टीत काम करण्यास सांगितले. भावना पांडे यांनी त्यांना सांगितले की, “ते आज जे काही आहे ते या चित्रपट विश्वामुळे आहेत.” चंकी पांडे यांनी एक किस्सा शेअर केला की, “ते काही वर्षांनी परत आले, तेव्हा त्यांना समजले की त्यांच्याबद्दल नवीन पिढीला फारशी माहिती नाही. त्यांच्यासाठी चंकी पांडे यांना ओळखणे कठीण आहे.”

चंकी पांडे यांनी एका शोमध्ये सांगितले की, मुलाच्या कमेंटने त्याचे हृदय कसे तुटले. ते म्हणाले की, “माझ्यासोबत घडलेली सर्वात मोठी घटना म्हणजे जेव्हा मी एका लग्नाला गेलो होतो, तेव्हा मला तिथे एक मुलगा भेटला. तो मुलगा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, ‘काका – काका असा ऐकल आहे की, तूम्ही एकेकाळी हिरो होतात, तुमचे नाव काय आहे.’ मुलाचे हे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले.” मुलाला उत्तर देताना ते म्हणाले की, “बाळा, तू जा आणि तुझ्या आईला माझे नाव काय आहे ते विचार, त्यांना माहित असेलच.”

चंकी पांडे यांनी सांगितले की, “अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करूनही शेवटी मला चित्रपटांमध्ये कमी काम का मिळाले? असे झाले कारण मी नेहमीच मल्टीस्टारर चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण जसजशी वर्षे सरत गेली तसतसे गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार सारखे कलाकार दरवर्षी पॉप अप करत राहिले. या सगळ्या दरम्यान त्यांनी एकल कलाकारांसाठी कोणतीच जागा सोडली नाही.

परंतु, चंकी पांडे यांनी स्वतः कबूल केले की, त्यांनी त्यावेळी जास्त चरित्र भूमिका केल्या होत्या. त्यांना वाटते की, त्यांना चांगले काम मिळाले असते. एकीकडे अनेक सुपरहिट चित्रपट देऊन ही त्यांना चित्रपट जगतात ते स्थान मिळाले नाही. तर दुसरीकडे तिची मुलगी अनन्या पांडे चित्रपटात पाऊल टाकण्याआधीच सोशल मीडिया स्टार बनली होती. करण जोहर निर्मित ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ हा तिचा पहिला चित्रपट मिळाला.

चंकी पांडेे यांना त्यांच्या तरुण वयात कमी चित्रपट मिळाले असतील. पण आजच्या युगात ते जवळजवळ प्रत्येक चित्रपटाचा एक भाग आहेत. ते केवळ त्याच्या विनोदानेच नव्हे तर त्यांच्या नकारात्मक भूमिकेने ही प्रेक्षकांची मने जिंकत आहे. चंकी पांडे यांनी अलीकडेच कुणाल खेमूसोबत ‘अभय २’ या वेब सीरिजमध्ये दिसले होते, ज्यामध्ये त्यांनी सिरियल किलरची भूमिका साकारली होती. याशिवाय ते लवकरच सैफ अली खान आणि अर्जुन कपूरसोबत ‘भूत पोलीस’ या चित्रपटात दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

एका पायजम्यामुळे चंकी पांडेला मिळाली होती चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, वाचा तो रंजक किस्सा
Jawan Box Office Collection Day 19: तिसऱ्या सोमवारी ‘जवान’च्या कमाईत मोठी घट, 19व्या दिवशीचे कलेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा