Tuesday, July 9, 2024

जेव्हा संपली होती दीपिकाची जगण्याची इच्छा, ‘बिग बीं’समोर सांगितले ‘मोठे’ रहस्य

टेलिव्हिजनचा नंबर वन क्विझ रियॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ वे पर्व प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. येथे आलेल्या स्पर्धकांच्या जीवनाशी संबंधित कथा प्रेक्षकांना कधी हसवतात, तर कधी रडवतात. यावेळी या शोमध्ये दर शुक्रवारी एक विशेष भाग प्रसारित केला जात आहे. यामुळे दर शुक्रवारी कलाकार शोमध्ये सहभागी होतात. या आठवड्यात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि कोरियोग्राफर फराह खान आजच्या भागाच्या पाहुण्या बनल्या आहेत.

या भागादरम्यान प्रेक्षकांना दीपिका आणि फराह यांच्या जीवनाशी संबंधित अनेक मजेदार गोष्टी ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, शोमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण केबीसी होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी तिच्या नैराश्याबाबत बोलताना दिसली.

शो दरम्यान, दीपिकाने बिग बींना सांगितले की, “मला २०१४ मध्ये नैराश्य (डिप्रेशन) आले होते. यानंतर मी एक मेंटल हेल्थ फाऊंडेशन सुरू केले. याद्वारे आम्ही या रोगाशी संबंधित लोकांना मदत करत आहे. त्यावेळी मला असे वाटत होत की, मी कामावर जाऊ नये. मला कोणाला भेटायचे नव्हते आणि मला बाहेरही जायचे नव्हते. मला त्यावेळी काहीच करायचे नव्हते.”

या दरम्यान दीपिकाने असे काही सांगितले की, तेथे उपस्थित असलेली फराह खान आणि अमिताभ बच्चन देखील क्षणभर स्तब्ध झाले. दीपिकाने सांगितले की, “नैराश्याने ग्रस्त असताना माझ्यामधील जगण्याची इच्छाच संपली होती.”

त्याचवेळी दीपिकाचे शब्द ऐकून फराह खान म्हणाली की, “सर, जेव्हा ती २०१४ मध्ये माझ्या ‘हॅप्पी न्यू इअर’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती, तेव्हा मला कल्पना नव्हती की, ती कोणत्या संकटातून जात आहे.”

फराह खानचे हे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन दीपिका पदुकोणला म्हणाले की, “आम्ही सर्वजण प्रार्थना करतो की, तुम्ही निरोगी राहावे आणि कधीच अशा परिस्थितीत जाऊ नये.”

याशिवाय, दीपिका पदुकोण आणि फराह दोघींनी या शोमध्ये अनेक मजेदार किस्सेही सांगितले आहेत आणि या शोमध्ये येण्याचा उद्देश देखील त्यांनी सांगितला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनेत्री सुरभी चंदना आहे तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्स संपत्तीची मालकीण; एका वर्षात कमवते १ कोटी

-रजनीकांत यांची ऑनस्क्रीन पत्नी बनून चर्चेत आली होती श्रिया सरन; शॉर्ट ड्रेसमुळे मागावी लागली माफी

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा