Monday, July 15, 2024

धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर धनुष-समंथाच्या लग्नाची रंगली सोशल मीडियावर चर्चा, पाहा काय म्हणतायेत नेटिझन्स

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता धनुष आणि पत्नी ऐश्वर्या रजनीकांतसोबतच्या घटस्फोटाच्या बातमीने सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या ही दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची मुलगी असून २००४ मध्ये तिने धनुषसोबत लग्न केले होते. तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आले नसून दोघांनीही याबाबत प्रतिक्रिया देणे टाळले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा पाहायला मिळतेय. या घटस्फोटानंतर धनुष आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला असून मीम्स जोरदार व्हायरल होत आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता धनुषने पत्नी ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या बातमीने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. या घटस्फोटाचे कारण अद्याप समोर आले नसले, तरी यानंतर आता धनुषचे नाव प्रसिद्ध अभिनेत्री समंथासोबत जोडले जात आहे.

धनुष आणि समंथाची मैत्री जगजाहीर आहे. दोघे अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. इतकेच नव्हे, तर दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री समंथानेही आपला पती अभिनेता नागा चैतन्यसोबतचे संबंध मोडत घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला होता. ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसला होता. त्यावेळीही धनुष आणि समंथाच्या नावाची चर्चा पाहायला मिळाली होती. आता समंथा पाठोपाठ अवघ्या दोनच महिन्यात धनुषनेही आपल्या पत्नीला घटस्फोट दिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. काहीजण तर धनुष आणि समंथाला ऍडव्हान्समध्ये लग्नाच्या शुभेच्छाही देत आहेत.

पाहा नेटिझन्स त्यांच्या ट्वीटमधून काय म्हणतायत-

 

हेही पाहा- १८ वर्षांचा संसार धनुष- ऐश्वर्याने एका ट्विटर पोस्टने संपवला

धनुष आणि समंथाने अनेक चित्रपटात एकत्र काम केले असून यामध्ये ‘चेन्नई सेंट्रल’, ‘थंगा मगन’, ‘सूधाडी’सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे. यामधील त्यांची केमिस्ट्री सर्वांच्या पसंतीस पडली होती. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही नेहमी ऐकायला मिळत असतात. त्यामुळे या सगळ्या बातम्या आणि चर्चा खऱ्या आहेत की, खोट्या हे अधिकृतरीत्या येतील तेव्हाच समजेल.

हेही वाचा-

हे देखील वाचा