Monday, February 10, 2025
Home बॉलीवूड लेटेस्ट व्हिडिओमध्ये लाजताना दिसली मलायका; पाहून ऋतिकची एक्स पत्नी म्हणाली, ‘माला तू तर १८ची…’

लेटेस्ट व्हिडिओमध्ये लाजताना दिसली मलायका; पाहून ऋतिकची एक्स पत्नी म्हणाली, ‘माला तू तर १८ची…’

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय, डान्स आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रींमध्ये मलायका अरोरा हिचा समावेश होतो. मलायका नेहमीच लाईमलाईटमध्ये येत असते. तिची प्रत्येक स्टाईल आणि लूक नेहमीच चर्चेत असतो. चाहतेही तिच्या प्रत्येक पोस्टसाठी आतुरतेने वाट पाहत असतात. नुकतेच काही दिवसांपूर्वी तिने बीचवरील फोटो शेअर करत एकच धुमाकूळ घातला होता. अशातच आता तिच्या एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओवर चाहत्यांसोबतच तिचे मित्रमंडळीही कमेंट्स करत आहेत. या व्हिडिओत मलायका लाजताना आणि आपले केस व्यवस्थित करताना दिसत आहे.

मलायकाचा लूक पाहून मैत्रिणीने केली कमेंट
रविवारचा दिवस जवळपास सर्वच कलाकारांनी मजा-मस्ती करत घालवला. अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिच्यापाठोपाठ मलायका अरोरा (Malaika Arora) हिनेदेखील आता रविवारी दिवशी लाजताना आणि केस व्यवस्थित करतानाचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत ती कधी आपले लूक्स दाखवताना दिसत आहे, तर कधी ती घराची झलक दाखवत आहे. या व्हिडिओत ती खूपच तरुण आणि फिट दिसत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांसोबतच तिच्या मैत्रिणीनेही कमेंट केली आहे.

तिची मैत्रीण आणि ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुझेन खान (Sussanne Khan) हिने लिहिले आहे की, “खूप गोड माला. तू १८ वर्षांची वाटत आहेस.” दुसरीकडे एका चाहत्याने कमेंट करत विचारले आहे की, “मॅडम तुम्ही खाता तरी काय?”

मलायकाच्या या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहूनही अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच २ हजारांहून अधिक कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.

मलायका नेहमी राहते लाईमलाईटमध्ये
मलायकाबद्दल बोलायचं झालं, तर ती नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. मागील काही दिवसांपूर्वी तिने शिमरी वन पीसमधील फोटो चाहत्यांना भलताच आवडला होता. त्याआधी तिचे बीचवरील फोटो खूप चर्चेत आले होते. मलायकाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मलायकाने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. ‘छैंय्या छैंय्या’ आणि ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यामुळे तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. मलायका ही अभिनेत्रीसोबतच एक व्यावसायिकही आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा