Tuesday, July 9, 2024

‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेता बनला ‘बापमाणूस’, ११ दिवसांनी दाखवली लेकाची झलक

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडपे असणाऱ्या धीरज धूपर आणि त्याची पत्नी विन्नी अरोरा धूपर यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. यामागील कारण म्हणजे, हे जोडपे पहिल्यांदा आई-वडील बनले आहेत. लग्नाच्या सहा वर्षांनंतर आई-वडील बनण्याचा आनंद काही औरच असतो. हाच आनंद हे दोघेही अनुभवत आहेत. दोघांनीही त्यांच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांचा फोटो पाहून चाहतेही खुश झाले आहेत.

धीरज धूपरने मुलासोबतचा पहिला फोटो
अभिनेता धीरज धूपर (Dheeraj Dhoopar) याने रविवारी (दि. २१ ऑगस्ट) त्याच्या चिमुकल्या मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोत दिसते की, त्याच्या मुलाने वडिलांचे बोट पकडले आहे. तो निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसत आहे. मात्र, फोटोत त्याचा पूर्ण चेहरा दिसत नाहीये. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “एकमेव स्थान, जिथे मला राहायचे आहे.” बापलेकाच्या या फोटोला चाहत्यांनीही चांगलीच पसंती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dheeraj Dhoopar (@dheerajdhoopar)

विन्नी अरोरानेही शेअर केला फोटो
धीरजपाठोपाठ त्याची पत्नी विन्नी अरोरा (Vinni Arora Dhoopar) हिनेही तिच्या मुलासोबतचा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोतही तिचे बाळ निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. या फोटोत अभिनेत्रीने तिच्या बाळाचा चेहरा दाखवला ननाहीये. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “आता माझ्याकडे दोन व्यक्ती आहेत.”

लग्नाच्या ६ वर्षांनंतर लाभलं आई-वडील बनण्याचं भाग्य
विन्नी अरोरा आणि धीरज धूपर यांचे सन २०१६मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या ६ वर्षांनंतर १० ऑगस्ट, २०२२ रोजी ते एका मुलाचे आई-वडील बनले. धीरजने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून शेअर केली होती. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, “ही घोषणा करत आनंद होत आहे की, आम्ही एका मुलाचे स्वागत केले आहे.”

धीरज धूपर याने ‘ससुराल सिमर का’, ‘कुंडली भाग्य’, ‘भाग्य लक्ष्मी’, ‘कुमकुम भाग्य’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. तसेच, विन्नी अरोरा हिने ‘पती पत्नी और वो’, ‘इतना करो ना मुझे प्यार’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
काय सांगता! हॉलिवूडच्या ‘या’ जोडीने एकाच महिन्यात केले दुसऱ्यांदा लग्न
बापरे! क्राईम पेट्रोलच्या निर्मात्यालाच घातला लाखोंचा गंडा, पाहा काय आहे प्रकरण
‘दुसरा कुठला असता तर आतापर्यंत उद्रेक झाला असता’, ऋतिक रोशन प्रकरणाचा वाद पेटला

हे देखील वाचा