Thursday, March 30, 2023

काय सांगता! हॉलिवूडच्या ‘या’ जोडीने एकाच महिन्यात केले दुसऱ्यांदा लग्न

हॉलिवूड चित्रपट ‘बॅटमॅन’ स्टार अभिनेता बेन ऍफ्लेक(Ben Affleck) आणि अभिनेत्री जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) यांनी पुन्हा एकदा लग्न केले आहे. लास वेगासमध्ये, दोन्ही स्टार्सने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांनी पुन्हा एकदा लग्न केले. त्यांचे जवळचे मित्र, कुटुंब आणि त्यांच्या मुलांच्या उपस्थितीत झाले. ऍफ्लेकच्या जॉर्जिया इस्टेटमध्ये जोडप्याने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या विवाह समारंभात जेनिफर आणि बेन पुन्हा लग्नबंधनात अडकले.

सोशल मिडियावर व्हारयल होत असलेल्या फोटोंमध्ये, जेनिफर लोपेझने हाता जेनिफर लोपेझने जेनिफर लोपेझनेत फुलं आणि सुंदर गाऊन घातलेला दिसत आहे. ती खूप सुंदर दिसत होती. हे लग्न ८७ एकरच्या रिव्हरफ्रंट व्हिलाच्या मैदानावर पार पडले. लग्नात बहुतेक पाहुण्यांनी पांढरे पोशाख परिधान केलेले दिसले.सोशल मीडिया इंफ्लूएंसर जय शेट्टीही दुसऱ्या लग्नाला उपस्थित होता. लोपेझने पांढरा राल्फ लॉरेन गाउन घातला होता तर बेन ऍफ्लेक याने काळ्या पँट आणि टायसह पांढरा टक्स घातला होता.

 

View this post on Instagram

 

त्यांची मुले, जेनिफर लोपेझची १४ वर्षांची जुळी मुले मॅक्स आणि एमे एक्स पती मार्क एथोनीसह आणि बेनची मुले व्हायोलेट, सेराफिना आणि सॅम्युअल त्यांच्यासोबत जेनिफर गार्नरसह देखील लग्नाला उपस्थित होते. जुलैमध्ये, बेन आणि जेनिफरने चाहत्यांना आश्चर्यचकित केले जेव्हा त्यांनी हे उघड केले की दोघांनी लास वेगासमधील ए लिटिल व्हाइट चॅपलमध्ये लग्न केले. हाय-प्रोफाइल जोडपे २००१ पासून एकमेकांना ओळखतात.

‘गिगली’ चित्रपटात जेन आणि जेनिफर एकत्र दिसल्या होत्या. त्याचवर्षी त्यांनी लग्न केले, परंतु काही कारणास्तव ते पुन्हा वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

राजूच्या तब्येतीविषयी त्याच्या कुटुंबाकडून महत्त्वाची माहिती, ‘या’ अभिनेत्याने ट्वीट करत दिली अपडेट
ऋषी कपूर यांच्या हट्टामुळे ‘या’ सुपरहिट चित्रपटाला दिला होता नकार, नीतू कपूर यांनी केला खुलासा
‘दिपवीर’चे प्रेमात पाडणारे फोटोशूट

हे देखील वाचा