लवकरच वाजणार सनई चौघडे? गर्लफ्रेंड पवित्रा पुनियाच्या आई- बाबांना भेटायला पोहचला एजाज खान


‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांची चांगलीच गट्टी जमली होती. शोमध्ये दोघांच्या डोळ्यांत एकमेकांविषयी रागही होता आणि प्रेम देखील होते. अशात दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे, त्यांचे त्यांनाही समजले नाही. दरम्यान एजाज खान पवित्राच्या घरी तिच्या कुटुंबीयांना भेटायला गेला होता.

एजाज खान आणि पवित्रा दोघेही टीव्हीवरील मालिकांमध्ये झळकत असतात. दोघांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज्य केले आहे. अशात हे दोघे एकमेकांना पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्येच भेटले. एजाजने त्याचा पवित्राच्या कुटुंबीयांना भेटल्या नंतरचा अनुभव सांगितला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, “मी या आधी पवित्राच्या भावाला भेटलो आहे. आता मी तिच्या घरातील बाकीच्या सदस्यांना भेटलो. मी थोडा घाबरलो होतो. त्यांच्याशी संवाद साधताना माझ्या हाताच्या तळव्यांना घाम फुटला होता. कदाचित त्यांनी मला बिग बॉसमध्ये असताना टीव्हीवर अनेक वेळा पाहिले आहे, त्यामुळे मी घाबरलो असे मला वाटते. मी आधीच पवित्राला सांगितले होते. जर मी शांत झालो, काही बोलत नसेल, तर तू माझा मुद्दा त्यांना लगेच सांग. तिच्या कुटुंबीयांशी मी खूप वेळ गप्पा मारल्या. पुढच्या भेटीला मी त्यांच्याबरोबर न घाबरता आणखी खुलून बोलण्याचा प्रयत्न करेन.” (Actor eijaz khan feels scared when he meets Pavitra punia’s family actor said my palms got swety)

पवित्रा बिग बॉसमधून बाहेर गेल्या नंतर अभिनेत्याने त्याच्या मनातील तिच्या विषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच काही दिवसांनी ती बिग बॉसच्या घरामध्ये पाहुणी म्हणून आली होती, तेव्हा तिने तिच्या मनातील त्याच्याबद्दलचे प्रेम त्याला सांगितले होते. शो संपल्यानंतर ते दोघेही बऱ्याचदा एकत्र डेट करताना दिसले होते. त्यांच्या प्रेमानंतर आता ते दोघे लग्न कधी करणार, याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा

-देव आनंद यांच्या रूपावर मरायच्या तरुणी, ‘यामुळे’ त्यांना सूट घालण्यावर शासनाने आणली होती बंदी

-अर्चना पूरन सिंग यांनी रात्री पळून जाऊन केलं होतं लग्न, बरंच चर्चेत राहिलंय त्यांचं वैयक्तिक आयुष्य


Leave A Reply

Your email address will not be published.