Saturday, June 29, 2024

इमरान हाश्मीने ‘सेल्फी’ चित्रपटाच्या सेटवर साजरा केला वाढदिवस, अक्षय कुमारनेही लावली सेलिब्रेशनला हजेरी 

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने त्याच्या मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर आज हे स्थान मिळवले आहे. त्याने बॉलिवूड जगताला एकापेक्षा एक हिट चित्रपट आहेत. इमरानने २००३ मध्ये ‘फूटपाथ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता तो लवकरच अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘सेल्फी’ या चित्रपटात दिसणार आहे. आता तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इमरान हाश्मी गुरुवारी (२४ मार्च) त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. इमरान हाश्मीचा वाढदिवस (Emraan Hashmi Birthday) ‘सेल्फी’ चित्रपटाच्या सेटवर साजरा करण्यात आला. यादरम्यान, अभिनेता अक्षय कुमारसह चित्रपटाच्या संपूर्ण युनिटही देखील या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले.

सेल्फीच्या सेटवर कापला केक 

‘सेल्फी’ (Selfiee) चित्रपटाच्या सेटवर अक्षय कुमारसह (Akshay Kumar) क्रू मेंबर्स आणि संपूर्ण टीमने इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) वाढदिवस उत्साहात साजरा केला. यादरम्यान अभिनेता इमरान हाश्मीने केक कापून वाढदिवस साजरा केला. चित्रपटाच्या संपूर्ण युनिटने ‘तुम जियो हजारों साल’ हे गाणे गाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनेता खूप आनंदी दिसला. इमरान हाश्मीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून या सेलिब्रेशनचा व्हिडिओही शेअर केला आहे.

नुसरत भरुचा आणि डायना पेंटीही दिसणार आहेत ‘सेल्फी’मध्ये

‘सेल्फी’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त यात अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी दिसणार आहेत. अलीकडेच त्याने अक्षय कुमारचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये सर्व कलाकारांच्या हातात एक फाईल होती, ज्यावर सेल्फी लिहिलेले दिसत आहे.

‘सेल्फी’ हा चित्रपट बनवला जात आहे धर्मा प्रोडक्शन अंतर्गत

अक्षय आणि इमरानच्या सेल्फी या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू असून, त्याचा काही भाग मध्य प्रदेशसह भोपाळमध्ये शूट केला जात आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन करणार आहे. ‘सेल्फी’ हा मल्याळम सुपरहिट चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा रिमेक आहे. सध्या ‘बच्चन पांडे’ बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी दाखवू शकलेला नाही. मात्र, आता हा चित्रपट काही अप्रतिम दाखवू शकतो का, हे पाहावे लागेल. इमरान हाश्मीच्या आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘मर्डर’, ‘जन्नत’, ‘कलयुग’, ‘वन्स अपॉन टाईम इन मुंबई’, ‘गँगस्टर’, ‘बादशाहो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा