Kangana चे किस्से | ‘लफडा झाला वाकडा तिकडा’ अन् थेट बंद झालं कंगनाचं ट्विटर अकाउंट? वाचा का झाली कारवाई

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे कधी-कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. कंगना ट्विटरवर खूप वादग्रस्त विधाने केल्यामुळे देखील ती चर्चेत राहिली आहे. याचमुळे कंगना रणौतचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर कंगनावर ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे. कंगना रणौत बुधवारी (२३ मार्च) तिचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर मग तिच्या वाढदिवशी तिच्या ट्विटर अकाऊंटबद्दल घडलेल्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया.

सोशल मीडियावर आला होता मीम्सचा महापूर
कंगना (Kangana Ranaut) ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारविरोधात सतत ट्वीट करत होती. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही त्यांनी केली. कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला होता.

कंगनाने ट्विटर निलंबित करण्याच्या मागणीवर दिलेली प्रतिक्रिया
अनेकवेळा कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने लिहिले होते की, “हा हा हा, मी अखंड भारतासाठी सतत उभी राहते, दररोज तुकडे-तुकडे टोळ्यांशी लढत असते आणि माझ्यावर देशाचे विभाजन केल्याचा आरोप होतो. व्वा. असो, ट्विटर हे माझ्यासाठी एकमेव व्यासपीठ नाही, एका चुटकीसरशी माझे म्हणणे घेण्यासाठी हजारो कॅमेरे माझ्यासमोर येतील.”

ऑक्सिजन भरून काढण्याबाबत ट्रोल्सनी केले होते ट्विट
याशिवाय कंगना ऑक्सिजन भरून काढण्याबाबत सतत ट्वीट करत होती. ट्वीटमध्ये तिने लिहिले की, प्रत्येकजण अधिकाधिक ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात गुंतला आहे, अनेक टन ऑक्सिजन सिलिंडर आणत आहे, कोणीतरी आम्हाला सांगा की, आम्ही पर्यावरणातून जबरदस्तीने ऑक्सिजन घेत आहोत त्याची भरपाई करण्यासाठी आम्ही काय करत आहोत? असे दिसते की, आम्ही आमच्या चुकांमधून आणि #PlantTrees या आपत्तीतून काहीही शिकलेलो नाही.” तिचे ट्विटर अकाऊट निलंबित केल्यानंतर देखील अभिनेत्री सतत चर्चेत राहिली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post