Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बापरे! ‘हिरो नंबर १’ गोविंदा सापडला मोठ्या अडचणीत, पत्नीने दिली माहिती

बॉलिवूडमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक सतत वाढत आहे. अभिनेता अक्षय कुमारनंतर आता गोविंदा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. गोविंदा सध्या होम क्वारंटाईन असून, तो वैद्यकीय उपचार घेत आहे.

गोविंदाच्या प्रवक्त्याने त्याच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “बरीच सावधगिरी बाळगूनही गोविंदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत आणि सध्या ते घरीच क्वारंटाईन आहेत.”

गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा यांनी अभिनेत्याच्या संपर्कांत आलेल्या लोकांना त्यांची कोरोना टेस्ट करुन घेण्याची विनंती केली आहे. “खबरदारी म्हणून गोविंदाच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना टेस्ट करुन घ्यावी”, असे आवाहन त्यांनी केले आहे. गोविंदाने लवकरच बरे व्हावे, यासाठी त्याचे चाहते, मित्र आणि हितचिंतकांकडून त्यांनी आशीर्वाद मागितला आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, गुरुवारी (1 एप्रिल) सकाळी गोविंदाची कोरोना तपासणी झाली, ज्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या तो घरी विलगीकरणात आहे आणि त्याच्यावर योग्य उपचारही सुरू आहेत. त्याच वेळी, गोविंदाच्या घरातील इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

फिल्म इंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील बर्‍याच लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरत आहे. अक्षय आणि गोविंदापूर्वी आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, सतीश कौशिक, टीव्ही इंडस्ट्रीची कलाकार रुपाली गांगुली, सुधांशू पांडे, राजन शाही, अमर उपाध्याय हे कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्याचबरोबर, रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोठी बातमी! बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार कोरोनाच्या तावडीत, सोशल मीडियावरून दिली माहिती

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

हे देखील वाचा