Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

कौतुकास्पद! गुरमीत चौधरीने केलेल्या मदतीमुळे रस्त्यात पडलेल्या व्यक्तीचा वाचला जीव, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगन कठीण आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खाली पडलेला दिसत आहे आणि त्याच्या छातीवर दुसरा व्यक्ती हाताने दाबताना दिसत आहे. पण हा व्हिडिओ कोणाचा आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? तर हा व्हिडिओ दुसरा, तिसरा कोणानाता नसुन प्रसिद्ध अभिनेता गुरमीत चौधरीचा आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता गुरमीत चौधरीचा (Gurmeet Chaudhary) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गुरमीत चौधरी एका बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला सीपीआर देत असल्याचे दिसत आहे. गुरमीत चौधरीच्या या त्वरित कृतीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, गुरमीत चौधरी कुठे तिरी चालला आहे.. या कार्यक्रमादरम्यान एक व्यक्ती अचानक बेशुद्ध पडते. गुरमीत चौधरीने त्वरित पुढाकार घेतला आणि त्या व्यक्तीला सीपीआर देण्यास सुरुवात केली. गुरमीत चौधरीच्या या कृतीमुळे त्या व्यक्तीला जीवदान मिळाले आहे.

गुरमीत चौधरीच्या या कृतीबद्दल लोकांनी सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले आहे. अनेक लोकांनी गुरमीत चौधरीला एक ‘हीरो’ म्हटले आहे. गुरमीत चौधरीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे की, त्याला मानवतेची काळजी आहे. गुरमीत चौधरीने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी फक्त माझ्या कर्तव्याचे पालन करीत होतो. कोणीही अशा परिस्थितीत अडकतो तर मी देखील त्याला मदत करतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

 हि घटना मुंबईतील अंधेरी भागात घडली आहे. सीपीआर देताना गुरमीत इतरांना लोकांना त्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चोळायला सांगतो. नंतर रस्त्यावर पडलेल्या ती व्यक्ती शुद्धीवर येते. त्यानंतर सर्व जण त्याला बसण्यास मदत करतात. उपस्थित सर्वजण अभिनेत्याचं तोंड भरून कौतुक करताना दिसत आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Famous actor Gurmeet Chaudhary saved the life of a person who fell on the road)

आधिक वाचा-
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर, ‘गडकरी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
प्रिया बापट अन् उमेशचे लिपलॉक फोटो व्हायरल; लोक म्हणाले, ‘कामत जोडी म्हणजे…’

हे देखील वाचा