Tuesday, June 25, 2024

अभिनेता गुरमीत चौधरी ‘महाराणा’ सिरीजमध्ये साकारणार ‘ही’ दमदार भूमिका, फर्स्ट लूक प्रदर्शित

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेता गुरमीत चौधरी लोकप्रिय अभिनेत्यांच्या गणतीमध्ये येतो. त्याने टीव्हीवर ‘राम’ ही भूमिका साकारत अमाप लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तो चांगलाच प्रसिद्ध झाला. पुढे तो विविध मालिकांमधून समोर आला. त्यानंतर त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता लवकरच तो हॉटस्टारच्या आगामी ‘महाराणा’ या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजमध्ये तो पराक्रमी आणि शिवभक्त अशा महाराणा प्रताप यांच्या भूमिकेत दिसेल.

नुकतेच या सिरीजचे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या शोचे दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई करत असून ते इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध सेट डिझायनर आहे. अद्याप शो कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणातच खुलासा झाला नसून, कलाकारांबद्दल देखील थोडी माहिती समोर आलेली आहे. या फर्स्ट लूकमध्ये गुरमीत शिवलिंगासमोर बसून पूजा करताना दिसत आहे. सिरीजमध्ये अश्विनी भावे, सुरेन्‍द्र पाल, दानिश भट, पृथ्‍वी हट्टे, महेश काळे, सुबोध भावे, माधव देवचक्‍के, समीर धर्माधिकारी आदी कलाकार दिसणार आहे. प्राप्त माहितीनुसार अभिनेत्री ऋद्धिमा पंडित महाराणीची भूमिका साकारणार असल्याचे समजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

तत्पूर्वी गुरमीत चौधरीने त्याच्या भूमिकेबद्दल सांगितले की, “अशा प्रोजेक्टवर काम करणे सन्मानाची बाब आहे. जे भारताच्या मुळांशी जोडले गेले आहे. महाराणा प्रताप यांना त्यांच्या साहस आणि हिंमतीसाठी ओळखले जाते. मी खुश आहे मला त्यांच्या आयुष्याशी संबंधित अधिक माहिती जाणून घेता आली. महाराणा प्रताप सारखी भूमिका साकारणे खरंच आव्हानात्मक आहे.”

तत्पूर्वी 2004 साली गुरमीतने या इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्याने कुमकुम भाग्य एक प्यारा सा बंधन मालिकेत छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर प्रसारित झालेल्या ‘रामायण’ मालिकेने त्याला नाव मिळवून दिले. (gurmeet choudhary plays maharana pratap in disney plus hotstar web series first look out)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
श्रीदेवी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चीनमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार त्यांचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा

श्रीदेवी नव्हती देत बोनी कपूर यांना भाव, मग अशी लढवली शक्कल; आपल्यापेक्षा 8 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत थाटला संसार

हे देखील वाचा