Monday, July 8, 2024

अं’मली पदार्थ प्ररणात अडकलेल्या अनन्या पांडेचा आधार बनला कथित बॉयफ्रेंड ईशान खट्टर; कसं ते वाचा

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे अं’मली पदार्थ प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान तपासावेळी आर्यनच्या व्हॉट्सऍप चॅटमध्ये एका अभिनेत्रीचे नावही समोर आले आहे. ती अभिनेत्री इतर कोणी नसून, प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची लेक अनन्या पांडे आहे. या चॅटमध्ये अनन्याचे नाव आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अभिनेत्रीची दोनदा चौकशी केली आहे. या चॅटमध्ये दोघेही अं’मली पदार्थांबाबत बोलत होते. दोनदा चौकशी केल्यानंतर अनन्याला तिसऱ्यांदा सोमवारी (२५ ऑक्टोबर) उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, ती एनसीबी ऑफिसला पोहोचली नव्हती.

अनन्या सध्या या कठीण काळातून जात आहे. अशा कठीण काळात तिचा कथित बॉयफ्रेंड ईशान खट्टर तिच्यासोबत उभा आहे. ईशानने अनन्याला पाठिंबा दर्शवला आहे. (Actor Ishaan Khattar Supports Ananya Panday In Difficult Time After Her Name Came In Aryan Khan Chat)

शनिवारी (२३ ऑक्टोबर) ईशानला रस्त्याच्या कडेला फुलांच्या दुकानातून पुष्पगुच्छ घेताना स्पॉट करण्यात आले होते. त्यानंतर एक तासानंतर त्याची कार अनन्याच्या घराबाहेर स्पॉट झाली होती.

ईशान देतोय अनन्याला साथ
अभिनेते चंकी पांडे यांच्या कुटुंबाच्या जवळच्या मित्राने सांगितले की, ईशान अनन्याला भेटण्यासाठी त्यांच्या घरी आला होता. जेव्हा अं’मली पदार्थ प्रकरणात अनन्याचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून ईशान अनन्याच्या संपर्कात आहे. तिचे कुटुंब ठीक आहे, या गोष्टीची तो काळजी घेत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ईशान अनन्या, तिचे कुटुंब आणि बहीण रायसाच्या खूप जवळ आहे.

अनन्या आणि ईशान एकमेकांना करतायत डेट?
अनन्याच्या कुटुंबाताच्या एका खास मित्राने सांगितले की, ईशान आणि अनन्या एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचे नाते खूप मजबूत झाले आहे. मात्र, दोघांनीही अद्याप आपल्या रिलेशनशिपबाबत अधिकृत घोषणा केली नाही. असे असले, तरीही सर्वांना माहिती आहे की, दोघेही सोबत आहेत.

चित्रपटसृष्टीतील अनेकांना वाटत असे आहे की, आर्यन आणि अनन्याबद्दल बोलले, तर त्यांच्या कुटुंबालाही टार्गेट केले जाईल. सोमवारी (२५ ऑक्टोबर) संजय गुप्ता यांनी शाहरुख खानच्या कठीण काळात शांत राहणाऱ्या कलाकारांना लज्जास्पद म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्हाला मारून टाकण्याच्या धमक्या येतायेत…’, पत्रकार परिषदेत क्रांतीने केला पती वानखेडेंच्या आरोपावर पलटवार

-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?

-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण

हे देखील वाचा