Monday, June 17, 2024

‘आम्हाला मारून टाकण्याच्या धमक्या येतायेत…’, पत्रकार परिषदेत क्रांतीने केला पती वानखेडेंच्या आरोपावर पलटवार

आर्यन खानचं अं’मली पदार्थ प्रकरण वेगळंच वळण घेऊ लागलं आहे. जोर धरत असलेल्या या प्रकरणाचा पलटवार एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरही होताना दिसतोय. त्यांच्यावर राजकीय हल्ले होत असताना, अशातच त्यांची पत्नी आणि मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरने मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने पतीवरील आरोपांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. यावेळी क्रांती म्हणाली, “समीर वानखेडे या सर्व वादातून बाहेर पडतील कारण सत्याचा नेहमीच विजय होतो. जे आरोप झाले आहेत ते सिद्ध होणार नाहीत.”

अलीकडच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांना मिळालेल्या धमक्यांचा संदर्भ देत क्रांती म्हणाली, “आम्हाला त्रास होत आहे. दुसऱ्या राज्यातून कोणीतरी येऊन आम्हाला धमक्या देत आहे. आम्हाला आमच्या राज्यात सुरक्षित वाटलं पाहिजे. समीर वानखेडेविरोधी असलेले लोक आम्हाला खूप त्रास देत आहेत. आम्हाला फाशी दिली जाईल, आम्हाला जाळले जाईल, अशा धमक्या मिळत आहेत. आमच्या जीवाला धोका आहे.” (mumbai drug case aryan khan sameer wankhede wife kranti wankhede press conference)

क्रांती पुढे म्हणाली, “आम्हाला सुरक्षा मिळाली आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मला, माझ्या मुलांना, माझ्या कुटुंबाला धमकावले जात आहे. आम्हाला फेक अकाउंट्सवरून ट्रोल केले जात आहे.”

अभिनेत्रीला नवाब मलिक आणि राजकीय हल्ल्यांबद्दल विचारले असता ती म्हणाली, “लोक समीर वानखेडे यांच्या विरोधात काम करत आहेत. मला वाटते समीरजींच्या कामाच्या पद्धतीमुळे त्यांना खूप त्रास होत आहे. त्यांना (आरोप करणार्‍यांना) वाटते की समीरजींमुळे त्यांना त्रास होऊ नये आणि त्यांचे काम तसेच चालू राहावे.”

राजकीय पक्षांच्या कारस्थानाबद्दल विचारले असता क्रांती म्हणाली, “मला वाटते की त्यांच्यामागे कोण आहेत, हे सांगण्यासाठी मी खूप लहान आहे. पण समीर इतके सहकार्य करतात की, सत्याचाच विजय होईल.” समीर वानखेडे हे भाजपचे बाहुले असल्याचा आरोप केला जात आहे, असे एका पत्रकाराने विचारले. यावर ती म्हणाली, “मला वाटते की समीरजींनी ज्या कलाकारांवर छापे टाकले आहेत त्यापैकी फक्त दोन ते तीन टक्के कलाकार आहेत, बाकीचे अं’मली पदार्थांचे पेडलर आहेत. त्यांच्यावरील कोणतेही राजकीय आरोप कधीच सिद्ध होणार नाहीत.”

पुढे जाऊन यात आणखी किती वळणं येतील, हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुठलंही धर्मांतर नाही, आम्ही दोघे जन्माने हिंदूच! मात्र, समीरची आई…’, क्रांती रेडेकरच्या ट्वीटने मोठा खुलासा

-आर्यन खान प्रकरण: समीर वानखेडेंनी मागितले ८ कोटी रुपये? साक्षीदाराचा मोठा आरोप

-वानखेडेंवर लावले जातायेत खंडणीचे आरोप, अभिनेत्री क्रांती रेडकरने पोस्ट करून अप्रत्यक्षपणे मांडली पतीची बाजू

हे देखील वाचा