Saturday, May 23, 2026
Home अन्य अरेरे! मुलीला रस्त्याच्या मधे एकटी सोडून पळून गेले कलाकार जोडपे, पाहा हैराण करणारा व्हिडिओ

अरेरे! मुलीला रस्त्याच्या मधे एकटी सोडून पळून गेले कलाकार जोडपे, पाहा हैराण करणारा व्हिडिओ

कलाकार छोट्या पडद्यावरील असो किंवा मोठ्या पडद्यावरील, ते नेहमीच आपल्या मुलाबाळांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. यामुळे त्यांच्या कुटुंबाची ओळख चाहत्यांमध्ये बनत असते. असेच काहीसे टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि अभिनेत्री माही विज यांच्या बाबतीतही आहे. ते नेहमीच आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी संपर्क साधत असतात. अशातच या अभिनेत्याने आपल्या गोडंस मुलीसोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे.  जो चाहत्यांना खूपच आवडल्याचे दिसून येत आहे.

जय भानुशालीने आपल्या १८ महिन्यांच्या मुलीचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, माही विजसोबत तो आपल्या मुलीला घेऊन रस्त्यावर जातो आणि यानंतर दोघेही मुलीला मधेच सोडून वेगवेगळ्या दिशेला पळून जातात.

यानंतर मुलगी थोड्या वेळासाठी थांबते आणि हसत हसत आपल्या वडिलांकडे म्हणजेच जय भानुशालीच्या दिशेने धावू लागते. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शन दिले आहे की, “ही बापाची मुलगी आहे. तुम्हाला माहीची रिऍक्शन पाहायला हवी होती. ती खूप उदास झाली होती की, ताराने तिच्याकडे एकदाही पाहिले नाही.” या व्हिडिओला इंस्टाग्रामवर आतापर्यंत एक लाखापेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

टीव्ही अभिनेता करणवीर वोहराने व्हिडिओवर कमेंट करत ‘वडिलांची मुलगी,’ असे लिहिले आहे. दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनेही हार्ट ईमोजी कमेंट करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. चाहतेही या व्हिडिओवर प्रेम व्यक्त करत आहेत.

दुसरीकडे माही काही दिवसांपूर्वीच म्हणाली होती की, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर परिणाम होण्याची बातमी वाचून ती तब्बल अर्धा तास रडली होती. तिने आपल्या मुलीबद्दलही बरेच काही म्हटले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मास्क न घालता रस्त्यावर ईद साजरी करत होती मुलगी, राखी सावंतने शिकवला चांगलाच धडा; पाहा व्हायरल व्हिडिओ

-अरे व्वा! अगस्त्यने टाकले पहिले पाऊल, हार्दिक आणि नताशाने केला व्हिडिओ शेअर

-‘ओव्हर ऍक्टिंगचे ५० रूपये कट करा’, लस टोचवताना मराठी अभिनेत्रीची नौटंकी पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हे देखील वाचा