Saturday, July 6, 2024

चित्रपटातील अन् ओटीटी प्लॅटफॉर्मवरील न्यूडीटीवर व्यक्त झाला जिमी शेरगिल; म्हणाला ‘मला आनंद…’

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जिमी शेरगिलने (Jimmy Sheirgill) आपल्या अभिनय कारकिर्दीत काही उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे/वेब सीरिजचे पात्र एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. जरी त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे न्यूडीटीची संकल्पना. जिमी सांगतो की, कोणत्याही प्रोजेक्टला हो म्हणण्यापूर्वी त्या चित्रपटाची किंवा वेब सीरिजची संकल्पना त्याच्या घरच्यांनी पाहण्यासारखी आहे की नाही हे पाहायला हवे. अलिकडेच ‘रंगबाज’, ‘युअर ऑनर सीझन १ आणि २’ चा भाग असलेल्या या अभिनेत्याला वाटते की, हीच इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांची मानसिकता असायला हवी.

जिमीने  त्याच्या अलिकडील मुलाखतीत अश्लील चित्रपट किंवा वेब सीरिजबद्दल सांगितले की, “मी अशा गोष्टींचा एक भाग बनण्याचा प्रयत्न करतो ज्यांच्याशी प्रेक्षक जोडू शकतात. उद्या जर मला दुसरी सीरिज मिळाली, जी वेगळी, कॉमेडी असेल, तर तीही करण्याचा मी प्रयत्न करेन.”

शोमधील न्यूडीटी आणि अपमानास्पद भाषेबद्दल विचारले असता, अभिनेत्याने उत्तर दिले, की “न्यूडीटी आणि या सर्वांशी तर मी आनंदी नाही. सीनमध्ये जे घडत आहे त्याला काही अर्थ असेल किंवा माझे पात्र खरे असेल तरच मी असा सीन करेन. पण केवळ अशा प्रकारचे सीन प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हे करणे, मला योग्य वाटत नाही. आजकालच्या चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये हे घडत आहे, जे मला समजत नाही.”

याच कारणामुळे जिमीला ‘योर ऑनर’साठी काम करण्यास सोयीचे वाटले, जे इस्त्रायली वेब सीरिज ‘क्वोडो’ चे रूपांतर आहे. तो नुकताच दुसऱ्या सीझनमध्येही दिसला होता.

जिमीने पुढे सांगितले की “मी ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर बरेच शो पाहतो. हे प्लॅटफॉर्म भारतात आले नसतानाही डिव्हीडीवर पाहायचे. अलिकडे, जेव्हा मला ‘योअर ऑनर’चा पहिला सीझन ऑफर करण्यात आला, तेव्हा मी मूळ सीरिज प्रथम पाहिली. त्याच्याशी कनेक्ट होण्यास सक्षम होतो मग त्याला हो म्हणालो.”

जिमीने त्याच्या करिअरची सुरुवात ‘माचिस’ या चित्रपटातून केली होती. यानंतर तो ‘मोहब्बतें’, ‘मेरे यार की शादी है’, ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

हेही वाचा :

हे देखील वाचा