Tuesday, June 25, 2024

ज्युनियर एनटीआरने चाहत्यांची जिंकली मने, या मंदिराला दिले 12.5 लाख रुपये

सध्या ज्युनियर एनटीआर (Junior NTR) त्याच्या आगामी ॲक्शन चित्रपट ‘वॉर 2’ साठी चर्चेत आहे. सध्या चित्रपटाचे काम सुरू असून, त्यावर काम वेगाने सुरू आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. ‘वॉर 2’ देखील चांगली कामगिरी करेल अशी आशा निर्मात्यांना आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, ज्युनियर एनटीआर आणखी एका कारणाने चर्चेत आहे, जे खूप खास आहे.

ज्युनियर एनटीआर यांनी आंध्र प्रदेशातील श्री भद्रकाली समिती वीरभद्र स्वामी मंदिराला देणगी दिली आहे. त्यांनी 12.5 लाख रुपयांची देणगी दिल्याचे वृत्त आहे. सुपरस्टारच्या या कामावर त्याचे चाहते खूप खूश दिसत आहेत. ज्युनियर एनटीआर 20 मे रोजी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करणार असल्याची माहिती आहे. यानिमित्ताने तो मुंबईतच राहणार आहे. कारण तिथे ‘वॉर 2’चे शूटिंग सुरू आहे.

‘वॉर 2’ हा यशराज स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. याचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे, ज्याने यापूर्वी ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘वेकअप सिड’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटात हृतिक रोशनही ॲक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबतही सस्पेन्स आहे. ‘वॉर 2’मध्ये ज्युनियर एनटीआर नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

ज्युनियर एनटीआरचे चाहते त्याचा लूक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘वॉर 2’चे पोस्टर किंवा टीझर त्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज होऊ शकतो. ‘वॉर 2’ व्यतिरिक्त ज्युनियर एनटीआर ‘देवरा’मध्येही काम करत आहे. जान्हवी कपूर या चित्रपटातून तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार आहे. या चित्रपटात सैफ अली खानही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवले तिचा आत्मविश्वास; म्हणाली, ‘यामुळे मी स्वतःला प्रेसेंट करते’
लग्नामुळे ट्रोल केल्याने भडकला अब्दू रोजिक; म्हणाला, ‘मला खुश राहण्याचा अधिकार नाहीये का?’

हे देखील वाचा