वडील आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे सामान्यांप्रमाणेच रुपेरी पडद्यावरील कलाकारांच्याही आयुष्यात दिसून येते. प्रत्येकजण आपल्या मुलांवर खूप प्रेम करताना दिसतो. अनेक कलाकार त्यांच्या मुलांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता ज्युनिअर एनटीआरने आपल्या मुलासोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये वडील आणि मुलगा दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत असून त्याचा सात वर्षांचा मुलगा वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. ज्युनिअर एनटीआर सध्या त्याच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘नाचो नाचो’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
सोशल मीडियावर ज्युनिअर एनटीआरने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा मुलगा अभय राम आपल्या वडिलांना किस करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. हा अनमोल क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि नंतर अभिनेत्याने तो त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. फोटोंमध्ये तो ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे.
ज्युनिअर एनटीआर अनेकदा कुटुंबासह ट्रिपला जातो आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत राहतो, ज्यामुळे चाहते खूप उत्साहित होतात. चाहते त्याच्या मुलासोबतच्या त्याच्या फोटोवर जोरदार कमेंट करत आहेत आणि त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “मला खूप काही सांगायचे आहे, पण प्रवासाचा आनंद लुटत आहे.” अभिनेत्याच्या पोस्टला अवघ्या काही तासांतच ७ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत
ज्युनिअर एनटीआरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो राम चरणसोबतच्या ‘आरआरआर’ चित्रपटात झळकणार आहे. त्याच्यासोबतच चाहतेही या चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत. याशिवाय त्याच्याकडे ‘एनटीआर ३०’ हा चित्रपटदेखील आहे. याचे दिग्दर्शन कोरतला शिवा करत आहेत. पुढील वर्षी ते पोस्ट प्रोडक्शनसाठी पाठवला जाईल. यासोबतच त्याने प्रशांत नीलसोबतही हातमिळवणी केली आहे. त्यांच्या त्या प्रोजेक्टचे नाव ‘एनटीआर ३१’ असे ठेवण्यात आले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आहा कडकच ना! आयफेल टॉवरसमोर नेहा कक्करने रोहनप्रीतला केले लिप-लॉक किस, युजर म्हणाला, ‘सावधान…’