‘तारक मेहता’च्या जेठालालने वाढवली स्पॅनिश पत्रकाराची लोकप्रियता, फोटो शेअर करताच ट्विटरवर वाढले फॉलोव्हर्स


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात हिट आणि लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोने टीआरपीच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकले आहे. या शोमधील प्रत्येक पात्र चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. या शोची लोकप्रियता केवळ देशापुरती मर्यादित नाही, तर परदेशातही या शोमधील प्रत्येक पात्राला आणि शोला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. विशेषतः ‘जेठालाल’चे पात्राला चाहते सर्वाधिक प्रेम व प्रतिसाद देतात.

जेठालालने स्पॅनिश पत्रकाराची वाढवली लोकप्रियता
आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘जेठालाल’च्या लोकप्रियतेचा आणि फॅन फॉलोव्हरचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, जेठालालचा फोटो शेअर केल्याने एका स्पॅनिश पत्रकाराच्या ट्विटरवर २०० फॉलोव्हर्स वाढले आहेत. खुद्द स्पॅनिश चेस पत्रकार डेव्हिड लाडाने याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “एकदा जेठालालला मेंशन केल्यानंतर माझे २०० फॉलोव्हर्स अचानक वाढले आहेत.”

चेसप्लेयरच्या मीमला स्पॅनिश पत्रकाराने केले होते शेअर
खरंतर, २१ नोव्हेंबरला आर्मेनियाचा चेसप्लेयर लेव्हॉन अरोनियनने ‘तारक मेहता’ शोमधील प्रिंटेड शर्टमधील जेठालालचा फोटो कोलाजमध्ये शेअर केला होता. विशेष बाब म्हणजे लेव्हॉन अरोनियननेही जेठालालच्या शर्टची कॉपी करत रंगीत प्रिंटेड शर्ट घातला होता. जेठालालसोबतचा हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करत त्याने कॅप्शन लिहिले की, “लोक मला विचारतात की, मी खेळतो तेव्हा माझी गर्लफ्रेंड काय करते? माझ्या फोटोसह मीम्स बनवायचे आणि आणखी काय काम…?

जेठालालच्या फोटोमुळे पत्रकाराचे वाढले फॉलोव्हर्स
लेव्हॉन अरोनियनची ही इंस्टाग्राम पोस्ट स्पॅनिश पत्रकार आणि चेस प्रवर्तक डेव्हिड लाडा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले की, “जेठालालने ते अधिक चांगले परिधान केले आहे.”

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेव्हिड लाडाने ट्विटरवर जेठालालचा फोटो पोस्ट केल्यानंतर आणि त्याचे कौतुक केल्यानंतर अचानक ट्विटरवर त्याचे २०० फॉलोअर्स वाढले. हे पाहून तो स्वतः खूप आनंदी आणि आश्चर्यचकित आहे. आता तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या हृदयात कसे राहतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…


Latest Post

error: Content is protected !!