Friday, July 5, 2024

ज्युनियर NTR ने घेतली हनुमान दीक्षा, पाळणार कडक व्रत, काय आहेत हनुमान दीक्षेचे नियम?

जुनियर एनटीआर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. मात्र त्याने त्याच्या दमदार अभिनयाने आणि ऍक्शनने संपूर्ण देशात, जगभरात स्वतःची ओळख निर्माण केली. सध्या त्याचा ‘आरआरआर’ हा सिनेमा संपूर्ण जगात धुमाकूळ घालत आहे. कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या या सिनेमाने प्रदर्शनाच्या काही दिवसांमध्येच बक्कळ कमाई केली आहे. अजूनही आरआरआर हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल जात असून, सिनेमातील जुनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. मात्र नुकतंच जुनिया एनटीआर हा एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

जुनियर एनटीआर संबंधित एक बातमी समोर आली आहे. त्याच्या आरआरआर सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो २१ दिवसांपर्यंत चप्पला न घालता राहणार असून, त्याने हनुमानाची दीक्षा घेतल्यानंतरचा त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जुनियर एनटीआरचा लूक अतिशय वेगळा आणि साधा दिसत आहे.

या फोटोमध्ये त्याने भगव्या रंगाचे कपडे घातले असून, गळ्यात माळा आणि कपाळावर तिलक लावला आहे. जुनियर एनटीआरच्या आधी रामचरणने अयप्पाची दीक्षा घेतली होती. मिळणाऱ्या माहितीनुसार जुनियर एनटीआरने नुकत्याच झालेल्या हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची पूजा केली तेव्हा तो अशा अवतारात पाहायला मिळाला. येणाऱ्या २१ दिवसांपर्यंत जुनियर एनटीआर चप्पल न घालता राहणार असून, या काळात तो सात्विक जेवण जेवणार आहे. जुनियर एनटीआर अतिशय धार्मिक व्यक्ती असून, तो अनेकदा मंदिरांमध्ये पूजा करताना दिसतो.

जुनियर एनटीआरचे नाव साऊथच्या टॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले असून, नुकत्याच त्याच्या प्रदर्शित झालेल्या आरआरआर सिनेमाने फक्त साऊथच नाही तर संपूर्ण देशात तगडी कमाई केली आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट्ट आणि अजय देवगण देखील महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय जुनियर एनटीआरचा कोराताला शिवा दिग्दर्शित एक सिनेमा यावर्षी प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो प्रशांत निल यांच्या आगामी सिनेमातही दिसणार आहे. नुकताच प्रशांत निल यांचा ‘केजीएफ २’ सिनेमा प्रदर्शित झाला असून, सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा