Saturday, April 20, 2024

हिंदू देवी-देवतांवर चुकीची टिपण्णी केल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुखीला अटक

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये अटक झाली आहे. मुनव्वर तिथे आयोजित एका कॉमेडी शो मध्ये सादरीकरणासाठी गेला होता. त्या शो मध्ये मुनव्वर फारुकीने हिंदू देवी-देवता सोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्याच्यावर केला गेला आहे. त्या आरोपांमुळे मुनव्वर आणि त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

इंदौरच्या एका कॅफेमध्ये शुक्रवारी नववर्षाच्या निमित्ताने एका कॉमेडी शोचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक भाजप आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौड यांचा मुलगा एकलव्य सिंह गौड हा देखील त्याच्या मित्रांसोबत कार्यक्रम बघायला उपस्थित होता. या कार्यक्रमात मुनव्वरने हिंदू देवी-देवतांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप एकलव्य सिंह गौड यांनी केला. त्यानंतर त्यांनी आणि त्याच्या साथीदारांनी कार्यक्रम मध्येच थांबवत कार्यक्रमाला विरोध केला. एकलव्य सिंग गौड यांनी ह्या कार्यक्रमाचे शूटिंग त्याच्या फोने मध्ये पुरावा म्हणून रेकॉर्ड केले. तेच रेकॉर्डिंग त्यांनी तुकोगंज पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल करत पोलिसानं समोर सादर केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुनव्वर फारुकी आणि इतर चार जणांना अटक केली.

मुनव्वर फारुख हा गुजरातच्या जुनागढचा रहिवासी असून सध्या तो मुंबईत असतो. कॉमेडी शोज साठी तो देशाच्या विविध शहरांमध्ये फिरत असतो. अटक केल्यानंतर मुनवारसह इतर चार जणांना कोर्टात सादर करण्यात आले, मात्र न्यायाधीश अमन सिंग भूरिया यांनी या पाचही जणांचा जमिनीचा अर्ज फेटाळून लावत त्यांना १३ जानेवारीपर्यंत जेलमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. या पाचही जणांविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २९५-ए म्हणजेच एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेतूपूर्वक कृती करणे, कलम २६९ जीवघेण्या आजाराचं संक्रमण पसरवणेआणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकलव्य सिंग गौड हा ‘हिंद रक्षक’ नावाच्या स्थानिक संघटनेचा संयोजक आहे.

हे देखील वाचा