हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमधून मार्ग काढत यशाचे शिखर गाठले आहे. यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेते कादर खान. कादर खान यांच्या संघर्षाची कहाणी थक्क करणारी आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि महान अभिनेते कादर खान (Kader Khan) यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्याच मनावर राज्य केले होते. मात्र, इथपर्यंत येण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. त्यांचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले. मुंबईच्या कामाठिपुरामधील एका झोपडीत ते राहत होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी खराब होती की, अनेकदा त्यांना उपाशी पोटी झोपावे लागत होते. मात्र, त्यांच्या आईच्या कष्टाने कादर खान यांचे शिक्षण पूर्ण झाले. कॉलेजात असताना ते अनेकदा नाटकात भाग घ्यायचे. या नाटकातील अभिनयासाठी त्यांना अनेक पारितोषिके मिळाली होती. त्यांना कॉलेजमध्ये केलेल्या नाटकासाठी बक्षीस म्हणून 1500 रुपये मिळाले होते. आश्चर्य म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा इतके पैसे पाहिले होते.
या घटनेची आठवण सांगताना कादर खान एका मुलाखतीत म्हणाले होते की, “त्यावेळी माझ्या ‘लोकल ट्रेन’ या नाटकासाठी मला सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी सगळीच पारितोषिके मिळाली होती. मला बक्षीस म्हणून 1500 रुपये देण्यात आले होते. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच इतके पैसे पाहिले होते. हे पैसे हातात घेताच माझे पाय थरथर कापत होते. 300 रुपये कमावत्या पोराच्या हातात 1500 रुपये आले, तर त्याची अवस्था अशीच होणार ना?”
कादर खान हे हिंदी चित्रपट जगतातील यशस्वी अभिनेते होते. त्यांनी 1973 मध्ये राजेश खन्ना यांच्या ‘दाग’ चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वात जास्त चित्रपटात काम केले आहे.गोविंदासोबत त्यांनी केलेल्या कॉमेडी चित्रपटांना प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. गोविंदा आणि कादर खान या जोडीने ‘हीरो नंबर वन’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’, ‘राजा बाबू’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले होते. कादर खान यांच्या अभिनयाच्या जादूने हे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा दिलीप कुमारांच्या डोळ्यात आले होते कादर खान यांच्यामुळे अश्रू, अभिनेत्याला मानावी लागली होती ‘ही’ अट
‘गाडीवाला आलाय घरातून कचरा काढा’, परिणीतीचा न्यूड फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले चांगलेच ट्रोल