भारतीय अमेरिकन अभिनेता काल पेनने स्वतःबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा त्याने नुकतेच त्याचे नवीन पुस्तक ‘यू कान्ट बी सीरियस’च्या प्रकाशनाच्या आधी केला. पुस्तकाचे प्रकाशन होण्यापूर्वी एका मुलाखतीदरम्यान कालने तो समलिंगी असल्याचे सांगितले.
असे म्हणतात की, प्रेमात वय, जात, लिंग काहीच पाहिले जात नाही, त्याचे उदाहरण आज आपण पाहणार आहोत. कालने त्याचा पार्टनर जोशसोबतच्या लग्नाची घोषणाही केली आहे. जोश आणि काल ११ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि आता कालला हे गुपित ठेवायचे नाही. अमेरिकेत जन्मलेल्या गुजराती कालने एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले आहे. त्याने सांगितले की, तो ११ वर्षांपासून जोशला डेट करत आहे.
काल पेन बॉयफ्रेंडसोबत करणार आहे साखरपुडा
यासोबतच त्याने सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात त्याची ११ वी आणि ऍनिव्हर्सरी होती. त्याच्या लैंगिकतेबद्दल बोलताना तो म्हणाला की, “मला माझ्याबद्दल हे इतर लोकांपेक्षा थोड्या जास्त वेळाने समजले. अशा गोष्टींना कालमर्यादा नसते, प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील काळापासून अशा गोष्टी समजतात. जेव्हा मला कळले, तेव्हा मला कळले याचा मला आनंद झाला.”
पेनने सांगितले की, त्याच्या लैंगिकतेबद्दल बोलणे त्याचे करिअर निवडण्यापेक्षा सोपे होते. तो म्हणाला की, “हो हे मजेदार वाटेल, पण एकदा तुम्ही तुमच्या पालकांना आणि दक्षिण आशियाई समुदायाला सांगितले की, तुम्हाला अभिनेता व्हायचे आहे. बाकीच्या गोष्टी सोप्या होतील. जेव्हा मी त्याला माझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्याने मला पाठिंबा दिला.”
काल पेन आणि जोशही त्यांच्या लग्नाची तयारी करत आहेत. त्याने सांगितले की, त्याला खूप आलिशान भारतीय लग्न करायचे आहे. पेन म्हणाला की, “मी एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि आमचे कुटुंब तिथे सामील होईल. आता छोटं लग्न की मोठं असा प्रश्न पडतो.”
तो त्याच्या वाचकांना त्याच्याबद्दल सांगण्यास उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चाहत्यांसाठी खुशखबर! रजनीकांत यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फोटो केले शेअर
-दारूच्या ब्रँडची ऍड केल्यामुळे, काजल अग्रवालवर भडकले नेटकरी; ‘या’ शब्दांत केलं तिला ट्रोल