Saturday, March 2, 2024

आठवडाभर 7 लाख वंचितांना अन्नदान करणार कमल हासन, अवयवदानासाठीही शिबिरे आयोजित

असे अनेक कलाकार आहेत ज्यांना नेहमीच गरीब लोकांची मदत करायला आवडते. ते नेहमीच गरजू लोकांना मदतीचा हात देत असतात. त्याचबरोबर असे देखील कलाकार आहेत ज्यांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही ना काही उपक्रम करायला आवडतो. ज्यातून त्यांच्या हातून दानधर्म व्हावा आणि गरजूंना त्याची मदत व्हावी हा त्यांचा उद्देश असतो. या कलाकारांपैकी एक अष्टपैलू अभिनेते कमल हासन आहेत. ज्यांनी आपल्या वाढदिवसापूर्वी एक सेवा सुरू केली आहे.

कमल हासन 7 नोव्हेंबरला त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. अभिनेता आणि राजकारणी कमल यांनी त्यांच्या वाढदिवसापूर्वी वंचितांसाठी मोफत भोजन सेवा सुरू केली आहे. ही मोहीम आठवडाभर चालेल जिथे त्यांचा पक्ष मक्कल निधी मैयम (एमएनएम) 7 लाख लोकांना अन्न पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवतील. या परोपकारी उपक्रमाला कमल हासन यांनी चेन्नई येथील त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयात हिरवा झेंडा दाखवला.

अवयवदान आणि आरोग्य शिबिरांचेही करण्यात येणार आयोजन
उलंगानायगन हे कमल यांचे नाव असून, त्यांचे चाहते त्यांना ते प्रेमाने संबोधतात. कमल यांनी आपल्या प्रभावशाली राजकीय कारकिर्दीत जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये, कमल यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काळजीपूर्वक नियोजन केले जात आहे आणि तमिळनाडू राज्यात ७० अवयव दान मोहिमेचे आणि वैद्यकीय शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.

‘हे’ देखील करतील काम
पक्षाच्या मुख्यालयातील कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसह इतर राजकीय नेत्यांच्या भेटीचा समावेश असेल. त्यानंतर ते चेन्नई आणि कोईम्बतूरच्या वंचित भागात ज्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी २ पिण्याच्या पाण्याचे प्लांट्स सुरू करण्याची घोषणा करतील. त्यानंतर ते कमल डिजीटल लायब्ररी आणि केएच स्कूल ऑफ स्किल डेव्हलपमेंटचे उद्घाटन करताना दिसणार आहेत. ज्यामुळे जीवन कौशल्ये आणि सर्व क्षेत्रातील प्राचीन कला शिकण्यास मदत होईल.

कमल दिसणार ‘विक्रम’मध्ये
कामाच्या वर्क फ्रंटमध्ये सुपरस्टार कमल हासन सध्या विजय सेतुपती आणि फहद फासिल सह-कलाकार असलेल्या ‘विक्रम’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे आणि तो संपूर्ण ब्लॉकबास्टर बनवण्यासाठी टीम कोणतीही कसर सोडत नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कमल हसनने उघडले गुपित, सांगितले ‘या’ कारणामुळे तो 5 वर्षे सिनेमापासून दूर होता

फक्त वीस मिनिटांची भेट आणि ‘इतक्या’ कोटींचा चुराडा, वाचा राणी एलिजाबेथ- कमल हसन भेटीचा भन्नाट किस्सा

हे देखील वाचा