बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत तिचा आगामी चित्रपट ‘थलायवी’साठी सज्ज झाली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट (१० सप्टेंबर) रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण तिचा ‘थलायवी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच कंगनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंगनाच्या आगामी चित्रपटाला मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये स्थान मिळाले नाही. कंगना तिच्या चित्रपटासाठी मल्टिप्लेक्सच्या मालकांवर खूप रागावली आहे. ती म्हणते की, जाणूनबुजून तिला कमी स्क्रीन दिल्या जात आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट करत व्यक्त केला संताप
सोशल मीडियावर एकामागून एक पोस्ट करत कंगनाने मल्टीप्लेक्स सिनेमाच्या मालकांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण त्याचबरोबर तिने त्यांना या कठीण काळात पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करताना कंगनाने लिहिले की, “या कठीण काळात एकमेकांना साथ द्या. असे काही चित्रपट आहेत जे चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. परंतु, ते चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केले जात नाही.”
कंगनाने केला गँगअपचा आरोप
कंगनाने मल्टिप्लेक्स सिनेमाच्या मालकांवर गँगिंग केल्याचा आरोपही केला आहे. ती म्हणते की, “चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘थलायवी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा धोका पत्करला आहे. बऱ्याच गोष्टींवर तडजोड केली आहे आणि हे केवळ प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाले आहे.” मल्टिप्लेक्स सिनेमाच्या विरोधात आवाज उठवताना कंगनाने त्यांच्यावर गँग-अपचा आरोप केला आणि म्हणाली की, “हिंदीमध्ये तिच्याकडे दोन आठवड्यांची विंडो आहे, तर तामिळमध्ये चार आठवड्यांची विंडो आहे. अशा परिस्थितीत आपले नुकसान भरून काढणे हा आपला मूलभूत अधिकार आहे.”
इंस्टाग्रामवर भडकली होती कंगना
नेहमीच वादात अडकलेल्या कंगना रणौतने अलीकडेच इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या ‘थलायवी’ चित्रपटासंदर्भात इंस्टाग्रामवर संताप व्यक्त केला. कंगनाला तिच्या आगामी चित्रपट ‘थलायवी’च्या ट्रेलरची लिंक बायोमध्ये शेअर करायची होती. पण ती तसे करू शकली नाही. त्यानंतर तिने सोशल मीडियावर इंस्टाग्राम अधिकाऱ्यांना फटकारले.
‘या’ भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट
जयललिता यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. एएल विजय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अरविंद स्वामी, प्रकाश राज, मधु आणि भाग्यश्री यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एकदम झक्कास! अनुजा साठेच्या नवीन फोटोवर श्रेया बुगडेची कमेंट; म्हणाली…