Tuesday, July 9, 2024

करण कुंद्राचा बॉलिवूड चित्रपट, ‘या’ सुंदर अभिनेत्रीसोबत पुन्हा दिसणार मोठ्या पडद्यावर  

‘बिग बॉस’च्या १५ व्या सीझननंतर पुन्हा एकदा करण कुंद्राच्या (Karan Kundrra) यशाचा पतंग आकाशात उंच उडू लागला आहे. करण कुंद्रा सोशल मीडियापासून व्यावसायिक जगतात बरीच लोकप्रियता मिळवत आहे. सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉस या रियॅलिटी शोनंतर करण कुंद्राच्या हातात अनेक नवीन प्रोजेक्ट्स आले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, करण कुंद्रा आता टीव्हीवर धमाल केल्यानंतर बॉलिवूडमध्ये अप्रतिम कामगिरी करण्यास तयार आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, करण कुंद्रा  लवकरच अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आणि रणदीप हुड्डासोबत एका बॉलिवूड चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटाबाबत इतर कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फ्री प्रेस जनरलने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितले की, करण कुंद्राचा नवीन प्रोजेक्ट या वर्षी सुरू होऊ शकतो.

करण कुंद्रा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आपला जलवा दाखवताना दिसणार नाही. या अभिनेत्याने यापूर्वीही अनेकवेळा हिंदी चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. करण कुंद्राने ‘१९२१’, ‘मुबारका’ आणि ‘हॉरर स्टोरी’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

करण कुंद्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर बिग बॉस १५ नंतर अभिनेत्री एकता कपूर लॉकअप शोमध्ये जेलर बनताना दिसत आहे. ‘द खतरा शो’मध्ये तो जॅकलिन फर्नांडिससोबत दिसला. इतकेच नाही तर करण कुंद्रा अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करत आहे. करण कुंद्रा सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. बिग बॉस १५ पासून तेजस्वी प्रकाशसोबतच्या नात्याबद्दल अभिनेता चर्चेत आहे. तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ ची विजेती आहे आणि करण कुंद्रा या सीझनचा दुसरा रनर अप होता.

‘बिग बॉस १५’ मध्ये आपण स्पर्धकांमधील भांडणे पाहिली आहेत. परंतु दोन स्पर्धक आहेत ज्यांनी आपल्या प्रेमळ केमिस्ट्रीने मन जिंकले आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश रियॅलिटी टेलिव्हिजन शो ‘बिग बॉस १५’ चे दोन सर्वात मजबूत स्पर्धक, भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील आवडते लव्हबर्ड्स आहेत. सलमान खानने होस्ट केलेल्या शोमध्ये तेजस्वी विजेती ठरली.

करण आणि तेजस्वी बिग बॉसच्या घरातून एकमेकांना पसंत करू लागले. अनेकवेळा त्यांनी एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या आणि परस्पर प्रेमाचा स्वीकारही केला होता. जेव्हा त्यांच्या पालकांनी शोमध्ये जोडप्याशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नातेसंबंधाला मान्यता दिली.

हे देखील वाचा