अभिनेता सलमान खान पास होण्यासाठी करायचा ही आयडिया, वडील सलीम खान यांनी सांगितला किस्सा

बॉलिवूडचा दबंग सलमान खान त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. सलमान खान एवढा प्रचंड मोठा चाहतावर्ग आणि स्टारडम खूप कमी अभिनेत्यांच्या नशिबी येते. त्याच्या चित्रपटांची, खासगी आयुष्याच नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सलमान खान सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. यावरून आपल्या चाहत्यांशी तो नेहमीच जोडलेला असतो. सलमान खान सध्या चित्रपट जगतात यशाच्या शिखरावर असला तरी बालपणी मात्र तो खूपच मस्तीखोर होता. याचाच किस्सा सांगणारा सलीम खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काय आहे तो किस्सा, चला जाणून घेऊ.

सलमान खान हा हिंदी चित्रपट जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. गेली तीन दशके त्याने या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याच्याप्रमाणेच त्याचे भाऊ सोहेल खान आणि अरबाज खानही चित्रपट जगतात नेहमीच सक्रिय असतात. मात्र सगळ्यात जास्त चर्चा होते ती सलमान खानची. सध्या सलमानचे वडील सलीम खान यांचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे ,ज्यामध्ये ते सलमान खानच्या बालपणीची एक मजेशीर आठवण सांगताना दिसत आहेत.हा व्हायरल व्हिडिओ कपिल शर्माच्या कार्यक्रमातील आहे, ज्यामध्ये सलमान खान, सलीम खान यांच्यासोबत आला होता. त्याचबरोबर त्याचे दोन भाऊ सोहेल आणि अरबाजही या कार्यक्रमात उपस्थित होते.

कार्यक्रमात सलीम खान यांनी तिघांच्याही बालपणीच्या अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांच्या बालपणीची एक मजेशीर गोष्ट सांगताना ते म्हणाले की “सलमान, सोहेल आणि अरबाज शाळेत पास होण्यासाठी पेपर लिक करत होते. यासाठी ते ज्या व्यक्तीची मदत घ्यायचे त्याची सलमान खान खूप बडदास्त ठेवायचा, त्याची काळजी घ्यायचा इतकेच नव्हेतर तो घरी आला की फक्त त्याच्याच मागेमागे फिरायचा. त्यांच्या या खुलाशाने कार्यक्रमात चांगलाच हशा पिकला होता.” दरम्यान सलमान सध्या हिंदी चित्रपट जगतात प्रचंड यश मिळवत आहे. त्याचा ‘टायगर ३’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची आणि कॅटरिना कैफची जोडी पून्हा एकदा पडद्यावर धमाल करताना दिसणार आहे.

Latest Post